राज्यस्तरीय पीक स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
तळोदा : राज्यस्तरीय रब्बी पिक स्पर्धेत आदिवासी गटातील पीक स्पर्धेत तळोदा तालुक्याने पटकावला प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या असून यांना आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र मुंबई येथे गैरव करण्यात आला..
शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम राज्यपातळीवरील रब्बी ज्वारी (२०२०-२१) पीक स्पर्धेत निकाल जाहीर करण्यात आला यात ज्वारी पिकात राज्यस्तरीय (आदिवासी गटात) नंदुरबार जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी बाजी मारली. शेती उत्पादनात नंदुरबार जिल्हा विविध पिकांमध्ये चांगले उत्पादन घेण्यात यशस्वी होत आहे.
रब्बी ज्वारी पीक स्पर्धेत आट्या देवजी पाडवी रा.खेडले (ता. तळोदा) यांनी ५१ क्विंटल ५० किलो इतके विक्रमी ज्वारी उत्पादन घेऊन राज्यात पहिला क्रमांक पटकावला. नोवा आट्या पाडवी रा. नर्मदानगर (ता. तळोदा) यांनी ४३ क्विंटल ज्वारी उत्पादन घेऊन दुसरा, तर बापू नागो पवार, रा. कळंबू (ता.शहादा) यांनी ३६ क्विंटल ४० किलो ज्वारी उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
विभागस्तरावर आमटा पारशी पाडवी रा खेडले आरशी पारशी भील रो पुनर्वसन हरभरा सायसिंग पावरा रोझवा पुनर्वसन बेहऱ्या पावरा रो पुनर्वसन तसेच तालुकास्तरीय प्रथम रंजना पावल्या पावरा रो पुनर्वसन व बावा पारशी पाडवी खेडले तसेच जिल्हास्तरीय बेहऱ्या स्वमसिंग पावरा रुजवा पुनर्वसन या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार तसेच पंचायत समिती तळोदा येथे आज कृषी दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
उपविभागीय कृषी अधिकारी शहादा विठ्ठल जोशी तळोदा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे कृषी अधिकारी राजेंद्र सावळे एकनाथ कदम श्री जयवंत पराडके विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती नंदुरबार जिल्हा प्रभारी कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, शहादा उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल जोशी, तळोदा तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, मंडळ कृषि अधिकारी रविंद्र मंचरे, खेडले कृषि सहाय्यक सचिन पाडवी व कृषि पर्यवेक्षक बी.एस.पाटील, व नर्मदानगर कृषि सहाय्यक सायसिंग पाडवी व कृषि पर्यवेक्षक आर. ए. पवार यांनी कौतुक केले.आदींसह जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.....
0 Response to "राज्यस्तरीय पीक स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार"
टिप्पणी पोस्ट करा