संपर्क करा

खासदार हिना गावीत यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण ;आमदारांची अनुपस्थिती ठरला चर्चेचा विषय

खासदार हिना गावीत यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण ;आमदारांची अनुपस्थिती ठरला चर्चेचा विषय

तळोदा: शहरात नगरपालिका निधीतून हातोडा रस्त्यावर साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दाराचे लोकार्पण खासदार हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

              छत्रपती शिवाजी महाराज  प्रवेशद्वाराचे लोकार्पण नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सायंकाळी करण्यात आले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, सुप्रिया गावित, भाजपचे विश्वासराव मराठे, धुळे येथील नगरसेवक प्रदीप कर्पे ,अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ.स्वप्नील बैसाने, किसान मोर्चाचे जिल्हा चिटणीस प्रविनसिंग राजपूत, दिलीप परदेशी, नगरसेविक योगेश पाडवी, अमनुदिन शेख, नगरसेविका अंबिका शेंडे, नवनीत शिंदे, अनुप उदासी, नगरसेवक सुरेश पाडवी, जालंधर भोई, रामानंद ठाकरे, दीपक पाडवी, सुभाष चौधरी, गौरव वाणी, माजी तालुकाध्यक्ष श्याम राजपूत, सतीवन पाडवी, माजी जि. प सदस्य जितेंद्र पाडवी, माजी नगरसेवक हिरालाल पाडवी, दिलीप परदेशी, रमेश भोई, जगदीश परदेशी, हेमलाल मगरे यासह मराठा समाज नवयुवक मंडळातील सदस्य उपस्थित होते. ढोल ताश्यांच्या गजर करत उपस्थित मान्यवरांना फेटे बांधून हा लोकार्पण सोहळा पार पडला.....

चौकट*** 
           सायंकाळी वरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहादा रस्त्यावर सकाळी सायंकाळी विरंगुळा व शतपावलीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी रन विथ फन उपक्रमा अंतर्गत लावण्यात आलेल्या साउंड सिस्टीमचे लोकार्पण देखील झाले......

आमदार राजेश पाडवी यांची अनुपस्थिती

            दरम्यान अजय परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाना व श्री.छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी आम राजेश पाडवी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला.  

           आम. पाडवी हे महत्वाच्या कामानिमित्त बाहेर गावी गेले असल्याचे या कार्यक्रम प्रसंगी सांगण्यात येत होते. मात्र ते सकाळी दलेलपूर येथे विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रमात उपस्थित होते. शिवाय दुपारी तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात देखील त्यांनी 1 तास हजेरी लावली असल्याचे समजते. तळोदा शहरात व आसपासच्या गावात आयोजित कार्यक्रमात उपस्थित असताना देखील ते नगराध्यक्ष परदेशी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले नसल्याने चर्चेचा विषय ठरला.

          आम.राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त हातोडा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले होते. व याच दिवशी आम पाडवी यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली होती. आमदार पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडणार होता. प्रवेशद्वार येथे लावण्यात आलेल्या कोणशीलेवर त्यांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. मात्र ऐनवेळी कार्यक्रमाला आमदारांच्या अनुपस्थितमुळे हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे....


17 जुलै 2021 रोजी अजय परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीछत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वाराचे लोकार्पण करताना खासदार हिना गावित व मान्यवर
17 जुलै 2021 रोजी अजय परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीछत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वाराचे लोकार्पण करताना खासदार हिना गावित व मान्यवर

5 मे 2021 रोजी आम.राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करताना आम.राजेश पाडवी व मान्यवर

0 Response to "खासदार हिना गावीत यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण ;आमदारांची अनुपस्थिती ठरला चर्चेचा विषय"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article