संपर्क करा

हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले             तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

तळोदा :  हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे सोळा  दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता तापी नदीपात्रात 45803 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
 
 तरी येत्या काही तासात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज मध्यम  प्रकल्पाची  पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल  व नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल.

तरी पुढील 24-48 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने  पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो  तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये  आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे.

0 Response to "हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article