संपर्क करा

कत्तलीच्या इराद्याने बांधून ठेवलेले 36 गुरे पोलिसानी घेतले ताब्यात

कत्तलीच्या इराद्याने बांधून ठेवलेले 36 गुरे पोलिसानी घेतले ताब्यात

तळोदा : कत्तलीच्या इराद्याने गुरे तळोद्या शहरात आणली असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी 36 गुरे ताब्यात घेतली असून तळोदा व अक्कलकुवा येथील 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुरे हे चौपाळा गोशाळा येथे रवाना करण्यात आली आहेत.       

           पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना गुप्त माहितीद्वारे तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लहान मोठी गुरे कत्तलीच्या इराद्याने नेणार असल्याचे सूत्रांकडून कळाले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नी रवींद्र कळमकर यांना याबाबत आदेशीत करून तातडीने पथक रवाना करून सदर गुरे ताब्यात घेण्याचे आदेश पो.अधीक्षक यांनी दिले. त्या अनुषंगाने पथक तळोदा येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीन सायं 5 वाजे दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समीतीत बैल बाजार भरत असलेल्या जागी दाखल झाले. याठिकाणी त्यांना गुरे बांधलेली आढळून आली, याबाबत संबंधिताना गुरांबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीचे उत्तरे मिळाल्याने त्यांच्या संशय अधिकच बळकट झाला. दरम्यान त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी नवले यांना बोलावूंन गुरांचे वय, उंची लांबी, रंग आदींची तपासणी करून घेतली. 

            दरम्यान याठिकाणी गुरांचा सोबत असलेले काही जणांनी सदर गुरे हे विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितले शिवाय आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी विक्रीची कर पावती असल्याचे देखील त म्हणाले. याविरोधात सदर बाब आम्हाला सांगू नये आपण न्यायालयास निदर्शनास आणून द्यावी न्यायालय याबाबत निर्णय घेईल असे संबंधित पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर कारवाईत एकूण लहान मोठे असे 36 बैल याप्रसंगी ताब्यात घेऊन गुरांची सुटका करण्यात आली असून त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

         पो.अधिकक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नी.कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई प्रसंगी सहायक पो.उपनिरीक्षक अनिल गोसावी, पो.ना.बापू बागुल, विशाल नागरे, तळोदा शहर पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, सहायक पो.निरीक्षक अविनाश केदार, पो.उपनिरीक्षक अभय मोरे, पो.ना युवराज चव्हाण, मोहन वळवी, पो.ना गणेश सोनवणे, पिंटू अहिरे, दिनेश वसावे, राजधर जगदाळे, आनंदा पाटील, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.

            दरम्यान तळोदा पोलीस ठाण्यात रीयाज खान रजाक खान कुरेशी रा. कुरेशी मौहला तळोदा व अक्कलकुवा येथील रसूल रेहमान कुरेशी वय 40 रा.कुरेशी महुला अक्कलकुवा ता.अक्कलकुवा यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2176 व प्राण्यांना क्रुरतेने वागवणे प्रतिबंधीत करण्याबाबतचा आधी नियम 1960 अनव्ये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पो.निरक्षक अविनाश केदार हे करीत आहेत. .

0 Response to "कत्तलीच्या इराद्याने बांधून ठेवलेले 36 गुरे पोलिसानी घेतले ताब्यात "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article