तळोदा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते 1160 लाभार्थ्यांना खावटी कीटचे वाटप
तळोदा : दि 19 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदातर्फे तळोदा येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान उपस्थित 1160 लाभार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते खावटी किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, तहसीलदार गिरीष वखारे, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जिप सदस्य सुहास नाईक, तळोदा कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरत माळी, नगरसेवक संजय माळी, तालुका अध्यक्ष रोहीदास पाडवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक, जि. प सदस्य संगीता पावरा, ॲड.भुवन वळवी, माजी जि.प सदस्य सी.के.पाडवी, सभापती महिला व बाल विकास प्रकल्प निर्मला राऊत, प.स सदस्य सोनी पाडवी, जिप सदस्य विजय पराडके, माजी जिप सदस्य हारसिंग पावरा, जि.प सदस्य संगीता पावरा, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, शहर अध्यक्ष गौरव वाणी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रवीण वळवी, प.स सदस्य चंदन पवार, माजी उपसभापती दीपक मोरे, नगरसेवक सुभाष चौधरी, नगरसेविका कल्पना पाडवी, माजी नगरसेवक पंकज राणे, सतीवान पाडवी, योगेश पाडवी, गोविंद पाडवी, प्रकाश ठाकरे, कृ.उ.बा.समितीचे संचालक बापू कलाल आदी उपस्थित होते.
ॲड. पाडवी म्हणाले, तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ न मिळालेल्या आदिवासी बांधवाना लाभ देण्यासाठी संबंधिताना सूचना देण्यात येतील. तळोदा शहरातील घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न केला जाईल व त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेश शिलाईचे काम स्थानिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले की, आदिवासी भागातील साधारणतः 90 हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोरोनाकाळात गुजरातमध्ये रोजगारासाठी गेलेल्या अनेक आदिवासी बांधवांचे रोजगार गेलेत. त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. भूमिहीन, विधवा महिलांना ही योजना अधिक दिलासा देणारी आहे. विशेष म्हणजे शहरातील आदिवासींना देखील ही योजना लागू आहे. पालकमंत्री पाडवी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने प्रगती केली आहे. त्यांच्या कार्याबद्दल जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.
प्रास्ताविकात श्री.घोष यांनी खावटी अनुदान योजनेची माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 55 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. 31 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. तळोदा प्रकल्पांतर्गत तळोद्यातील 19 हजार 861, अक्कलकुवा 33 हजार 827, धडगाव 29 हजार 766 असे एकूण 83 हजार 454 कुटुंबांना योजनेचा लाभ होणार आहे. आतापर्यंत 80 हजार 292 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पहिल्या टप्प्यातील रुपये 2000 प्रमाणे 16 कोटी 6 लक्ष रुपये वर्ग करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, अमित वसावे, श्रीमती एस. आर. सोळंकी, के.सी. कोकणी, विकास वळवी मगण वळवी संचालक आदी विकास महामंडळ नाशिक, ऍड.गोपाल पाडवी युवा नेते, तुषार वाघ, विस्तार अधिकारी जी.डी. अखडमल, एन.डी.ढोले, बी.आर. मुंगळे आदीच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक अधीक्षक, अधिक्षिका, गृहपाल शिक्षक यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमा प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत, पो.निरीक्षक पंडित सोनवणे, सहाय्यक पो.निरीक्षक अमित बागुल यांनी चौक बंदोबस्त ठेवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.टी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत, पो.निरीक्षक पंडित सोनवणे, सहाय्यक पो.निरीक्षक अमित बागुल यांनी चौक बंदोबस्त ठेवला....
चौकट***
खावटी किटमध्ये मटकी 1 किलो, चवळी 2 किलो, हरभरा 3 किलो, पांढरा वाटाणा1 किलो, तूरडाळ 2 किलो, उडीद डाळ 1 किलो, मीठ 3 किलो, गरम मसाला 500 ग्रॅम, शेंगदाणा तेल 1 लिटर , मिरची पावडर 1 किलो, चहा पावडर 500 ग्रॅम, साखर 3 किलो असे एकूण 18 किलो व 1 लिटर तेल असे साहित्य 1160 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले....
चौकट***
आयोजित कार्यक्रमाची वेळ साय. 4 वाजता निश्चित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने लाभार्थी वेळेवर उपस्थित झाले होते. मात्र पालकमंत्री कार्यक्रमाला उशिरा आल्याने कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 7;30 वाजता झाल्याने उपस्थित लाभार्थ्यांनी 4 तास प्रतीक्षा करावी लागली त्यामुळे लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली....
0 Response to "तळोदा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते 1160 लाभार्थ्यांना खावटी कीटचे वाटप"
टिप्पणी पोस्ट करा