अ.शि मंडळ द्वारा संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी भरतभाई माळी यांची निवड..
तळोदा : अ.शी मंडळ द्वारा संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट तळोदा जिल्हा नंदुरबार या संस्थेच्या अध्यच्यापदी तळोदाचे माजी नगराध्यक्ष भरत माळी यांची निवड..
माजी अध्यक्ष सुदाम शंकर पटेल यांनी अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या अध्यक्ष पदाचा निवडीसाठी आज रविवारी रोजी दुपारी 2 वाजता कॉलेजच्या सभागृहात प्रभारी अध्यक्ष सुधीर माळी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सभेस संस्थेचे कोषाध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी अध्यक्ष सुदाम पटेल, आमंदार तथा स्वीकृत सदस्य राजेश पाडवी, प्राचार्य तथा संस्थेचे सचिव डॉ.एस.आर.मगरे, संचालक सौ.मंगलाताई महाजन, हेमंत चौधरी, निखिल तुरखीया, गौतम जैन, दिनेशचंन्द्र देसाई, सुमनलाल शहा, नारायण राजकुळे, प्रा.रमेश सुर्यवंशी, आदी उपस्थित होते.
दरम्यान मागील इतिवृत्त वाचून सभेला सुरुवात करून काही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली, दरम्यान अध्यक्ष पदासाठी भरतभाई माळी, व सुधीरकुमार माळी यांची नावे अध्यक्ष पदासाठी पुढे आली. दरम्यान संचालक मंडळाच्या चर्चेतून किरकोळ बाबी वगळता एक मताने भरतभाई माळी यांचा नावाला पसंती देत त्यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. बैठकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पो.उपनिरीक्षक अभय मोरे व कर्मचारी यांनी चौक बंदोबस्त ठेवला .
प्रतिक्रिया***
संचालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अध्यक्ष पद मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य व अ.शि.मंडळच्या अध्यक्ष या नात्याने तळोदा तालुक्यातील शैक्षणिक समस्यांवर मार्ग काढण्यास प्रयत्नशील असणार असून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या शाखा मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे.
भरत माळी
अध्यक्ष अ.शि.मंडळ द्वारा संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तळोदा
0 Response to "अ.शि मंडळ द्वारा संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी भरतभाई माळी यांची निवड.."
टिप्पणी पोस्ट करा