संपर्क करा

खडकी येथे बाल उपचार केंद्र सुरु करा- राधाकृष्ण गमे

खडकी येथे बाल उपचार केंद्र सुरु करा- राधाकृष्ण गमे

तळोदा : खडकी परिसरातील अतितीव्र कुपोषित बालकांवर स्थानिक स्तरावरच उपचार करण्यासाठी नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत बाल उपचार केंद्र सुरू करण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

धडगाव तालुक्यातील खडकी येथे प्राथमिक केंद्र भेटीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.नारायण बावा, तहसिलदार मिलींद कुळकर्णी, गट विकास अधिकारी सी.टी.गोसावी आदी उपस्थित होते.
श्री. गमे म्हणाले, अंगणवाडी केंद्रात पौष्टीक आहार देवूनही अतितीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करुन कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बाल उपचार केंद्र उपयुक्त ठरेल. तोरणमाळ येथील केंद्रात बालकासोबत पालक थांबण्यास तयार नसल्याने स्थानिक स्तरावर उपचार करणे सोयीचे ठरेल आणि बालकांच्या प्रकृतीचीही चांगली काळजी घेतली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार उपचारात बदल करता येईल.

आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात त्रृटी असल्याने त्रयस्थ यंत्रणेमार्फत बांधकामाची चौकशी करण्यात यावी. बांधकामात आवश्यक दुरुस्ती करुन आरोग्य केंन्द्रातील कामकाज लवकर सुरू करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

खडकी परिसरातील  जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कालांतराने तोरणमाळ येथील इंटरनॅशनल स्कुलमध्ये दाखल होणार असल्याने परिसरातील खाजगी निवासातील अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत स्थंलातरीत करण्याबाबत आतापासून नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिल्या.

श्री.गमे यांनी आरोग्य केंन्द्र परिसरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. जनजागृतीसाठी शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी चांगले प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.अधिकाधिक नागरीकापर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाविषयी माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर श्री.गमे यांनी झापी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस भेट दिली. तेथील सुविधेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.परमानंद रावळे हे दुर्गम भागात सेवा देत असल्याने त्यांचे कौतुकही केले. आरोग्य केंद्रातील सुविधाबाबत परिसरातील नागरीकांना माहिती द्यावी आणि यासुविधेचा उपयोग त्यांनी करावा यासाठी त्यांचे समुपदेशन करावे असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

*तोरणमाळ इंटरनॅशनल स्कुल इमारतीची पाहणी*

विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी तोरणमाळ येथील नवनिर्मित इंटरनॅशनल स्कुल इमारतीची पाहणी केली आणि तेथील आवश्यक सुविधांची माहिती घेतली. शाळेच्या परिसरात स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत  आणि परिसरातील एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. शाळेच्या  परिसरात श्री.गमे यांच्या हस्ते एनएसई फाऊंडेशन आणि सीवायडीए संस्थेतर्फे  कुपोषण कमी करण्यासाठी देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या 2 हजार किटचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.

त्यानंतर श्री.गमे यांनी मानव विकास मिशन अंतर्गत तोरणमाळ येथील यशवंत तलावात उभारण्यात आलेल्या पिंजऱ्यातील  मत्स्य पालन प्रकल्पाची माहिती घेतली. त्यांनी गटातील महिलांशी देखील संवाद साधला. जिल्हा नियोजन अधिकारी  योगेंद्र चौधरी आणि जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास ) विजय शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती दिली.


नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.24

0 Response to "खडकी येथे बाल उपचार केंद्र सुरु करा- राधाकृष्ण गमे"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article