संपर्क करा

वीज बिल थकल्याने तळोदा पंचायत समितीचे कनेक्शन कट !

वीज बिल थकल्याने तळोदा पंचायत समितीचे कनेक्शन कट !

तळोदा : सहा महीन्यापासून वीज बिल न भरल्याने, थकीत वीज बिलाचे कारण दाखवत वीज महावितरणने अखेर आज पंचायत समितीचे वीज कनेक्शन कट केले आहे. परिणामी विजेअभावी तांत्रिक अडचणी निर्माण होऊन पंचायत समितीच्या कारभारात अडथळा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

         तळोदा पंचायत समितीचे गेल्या सहा महिन्यापासून ३८ हजार रुपयांचे वीज बिल थकीत होते. वेळेवर वीज बिल भरणा न केल्यामुळे आज दि. २४ रोजी सकाळी महावितरणचा कर्मचाऱ्यांकडून पंचायत समितीच्या विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला असून विजेअभावी पंचायत समितीतील संगणक, पंखे, तसेच बल्ब बंद अवस्थेत असल्यामुळे पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना काम करताना चांगलीच गोची झाली. 

            विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, यासाठी गट विकास अधिकारी आर.बी.सोनवणे  तसेच सभापती यशवंत ठाकरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र संबंधितांनी आपण नियमानुसार वीजपुरवठा खंडित करीत असल्याचे सांगून कनेक्शन कट केले आहे. दरम्यान महावितरणकडून थकित बिलाचे कारण दाखवून पंचायत समितीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असला तरी तहसील तसेच अन्य प्रशासकीय कार्यालयाच्या पुरवठा खंडित केला नसल्याचे समजते.  

           पंचायत समितीच्या पुरवठा तात्काळ सुरू न झाल्यास ग्रामीण भागातील विविध योजनांचा लाभासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तसेच घरकुल, शौचालय आदि लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी तांत्रिकदृष्ट्या पूर्तता करतांना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पंचायत समितीचा विद्युत पुरवठा तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे. दरम्यान कोरोनाच्या परिस्थितीमुळे पं. स.कडे सादिक बिलाची रक्कम उपलब्ध होऊ न शकल्यामुळे वीजबिल थकल्याचे कारण पंचायत समितीच्या सूत्रांकडून देण्यात आले असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे...

या कार्यालयांचाही पुरवठा खंडीत
            गटसाधन केंद्र ७०००रु थकीत १५ महिन्यांपासून
प.स बांधकाम विभाग १६ हजार रु. १ वर्षांपासून थकीत
पंचायत समिती २० हजार रु ५ महिन्या पासून थकीत
सहाय्यक निबंधक कार्यालय १२६०० रु २ वर्षांपासून थकीत पंचायत समिती सभागृह ७००० रु तीन महिन्यापासून थकीत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ९ हजार रु ८ महिने पासून थकीत वेळोवेळी स्मरण पत्र देण्यात आले होते. त्यासोबत दहा ते १२ वेळा पत्रव्यवहार झाला आहे, वीज वितरण विभागाकडून रजिस्टर मोबाईलद्वारे संदेश जातो.तरी देखील सबंधितांकडून वीज बिल भरणा होत नसल्याने महावितरणने या सर्व विभागांचा विद्युत पुरवठा खंडित केला असल्याची माहीती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली आहे..

प्रतिक्रिया*** 
               महावितरणचे कर्मचारी थकित बिल वसुलीसाठी पं.समितीत वारंवार चकरा मारत होते. पण संबंधिताकडून वेळेवर विज बिल भरणा केला गेला नाही.अखेर सहा महिन्यांनंतर नियमानुसार विज कनेक्शन कट करण्यात आले आहे..

इम्रान पिंजारी 
सह्यायक अभियंता,
महावितरण ,तळोदा शहर

0 Response to "वीज बिल थकल्याने तळोदा पंचायत समितीचे कनेक्शन कट !"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article