संपर्क करा

शेळींच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; शेळी ठार

शेळींच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; शेळी ठार

तळोदा : तालुक्यातील मोड येथील आष्टे शिवारात सोमवार रोजी शेळ्या चारत असलेल्या व्यक्ती समोर शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात एक शेळीला जागीच ठार करत फरपटत उसाच्या शेतात घेऊन गेल्याची घटना घडली.

            सविस्तर घटना अशी की, तळोदा तालुक्यातील मोड येथील आष्टे शिवारात कळमसरे रस्त्यावर आष्टे येथील पशुपालक दिपक पुरुषोत्तम कतांगे हे शेळ्या चारून घरी येत असतांना शेळींच्या कळपावर अचानक हल्ला केला आणि एका शेळीला आपल्या जबड्यात पकडली ! पशु मालक एकदम घाबरला, त्याने आरडा ओरड केली, त्याठिकाणी उपस्थित मजूर वर्ग लगेचच गोळा झाला व त्यांनी सुद्धा आरडा ओरड सुरू केली. बिबट्याला जोर - जोराचा आवाज येकू आल्यामुळे, जबड्यात पकडलेली शेळी त्याने लागलीच जमिनीवर सोडली आणि तेथून पसार झाला. परंतु सदरील शेळी पूर्णपणे मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले.

             मोड, खरवड, कढेल, मोहिदा, भवर, प्रतापपूर इत्यादी गावांच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, मजूरवर्ग, अत्यंत भयभीत झाले आहे. अशा घटना दर दोन दिवसांनी ऐकण्यास मिळत असल्याने शेतकरी व शेतमजूर आपला जीव मुठीत धरून शेतातील कामे करीत आहेत. सद्या कापूस लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतमजूर, शेतकरी शेतात दिवस रात्र मेहनत करतांना दिसून येत आहे. परंतु बिबट्याच्या धास्तीने शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.



0 Response to "शेळींच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; शेळी ठार"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article