संपर्क करा

गर्भवती महिलांनी देण्यात आलेले अंडी निकृष्ट दर्जाचे : अंडी खावुन दाखवण्याचे गटविकास अधिकारी यांना आव्हान

गर्भवती महिलांनी देण्यात आलेले अंडी निकृष्ट दर्जाचे : अंडी खावुन दाखवण्याचे गटविकास अधिकारी यांना आव्हान


तळोदा : भारतरत्न डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रातून गर्भवती स्तनदा मातां व बालकांना देण्यात येणारा सकस आहाराच्या नावाखाली सडकी अंडी पुरवठा केला जात असल्याचा गंभीर प्रकार तळवे येथे समोर आला आहे. 

          आदिवासी विभागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याच्या हेतूने शासनाने डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सहा महिने ते सहा वर्षे वयोगटापर्यंतची मुले-मुली तसेच स्तनदा व गर्भवती मातांना पोषण आहार दिला जातो. मात्र प्रशासकीय हलगर्जीमुळे निकृष्ट स्वरूपाचा आहार लाभार्थ्या पावेतो पोहच होत आहे. असाच एक प्रकार तळवे येथे उघडकीस आला असून तळवे येथील गर्भवती महिला मनीषा रमाकांत वळवी यांना अंगणवाडी मार्फत अमृत आहार योजनेच्या पहिल्या टप्पातील अंडी पूरवठा करण्यात आले. त्यांनी नेहमी प्रमाणे ते उकळण्यासाठी ठेवले असता अंड्याची दुर्गंधी उग्र स्वरूपात पसरल्याने, मिळालेली अंडी सडकी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी इतर अंडी फोडून पाहली असती त्या अंड्यात मृत पिले निघाली, काही अंड्यामध्ये आळया आढळून आले. परिणामी मनीषा वळवी यांचे पती रमाकांत वळवी यांनी ते अंडी सोबत नेत थेट गटविकास अधिकारी कार्यालय गाठले व सोबत आणलेली अंडी गटविकास अधिकारी यांच्या टेबलावर ठेवली. संबधीत प्रशासनाकडून प्राप्त होणारे अंडे आदिवासी गर्भवती महिलांना जीव घेनी ठरत असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

              कोरोना संकट काळात आदिवासी भागात पोषण आहाराची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र अंगणवाडी कडून देण्यात आलेली अंडी अधिकाऱ्याने खाऊन दाखवावे असे आव्हान त्यांनी गटविकास अधिकारी यांनाच केले. दरम्यान गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी त्यांची समजूत काढून याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. चौकशी करणे संदर्भात रमाकांत वळवी यांनी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन दिले. 

               जिल्हा परिषद प्रशासन, याअंतर्गत एकात्मिक बालविकास केंद्र तथा महिला व बालविकास विभागाचा अंकुश नसल्याने या योजनेची दिशा भरकटत चालल्याचे मानले जात आहे. या योजनेंतर्गत तालुक्‍यात पारदर्शकतेने चौकशी झाल्यास लाभार्थी बालकांची रोज नेमकी किती उपस्थिती आणि प्रत्यक्षात किती अंडी वाटप झाली ? याचा वास्तव ताळमेळ समोर येऊ शकेल. त्यातून सरकारचे कुपोषणमुक्तीचे उद्दिष्ट सफल होते आहे किंवा नाही ते स्पष्ट होऊ शकेल. येथे मात्र या उद्दिष्टापेक्षा लाखोच्या अनुदानावरच अनेकांचा डोळा असून खिसे भरण्यावर लक्ष्य ठेवण्यात आल्याचे विविध तक्रारींवरून दिसते..

*चौकट***
              रमाकांत वळवी यांनी अंडी निकृष्ट स्वरूपाची आहेत किंवा नाही हे दाखविण्यासाठी सोबत आणलेले अंडी पंचायत समितीच्या आवारात फोडून प्रात्यक्षिक करून दाखवले असता त्या अंड्यात मृत पिले व आळया आढळल्या शिवाय त्यातून उग्र वास येत होता. दरम्यान सदर प्रकरामुळे उपस्थित नागरिकांनी प्रशासनाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली....

*प्रतिक्रिया****
              अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही आदिवासींचे कुपोषण नष्ट करणेसाठी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अंगणवाडीकडून प्राप्त झालेले अंडी ही निकृष्ट व सडक्या स्वरूपाची प्राप्त होत आहे. यापूर्वी देखील अश्याच प्रकारचे अंडी व इतर कोरडा आहार प्राप्त झालेला आहे. याबाबत संबंधित जबाबदार अधिकारी हे केवळ कार्यालयात बसून उंटावरून शेळ्या हाकलण्याचे कामे करतात प्रत्यक्ष त्यांनी वाटप होत असलेला आहार पाहणे गरजेचे आहे. मात्र तसे न झाल्यामुळे सदर प्रकार घडत आहे. यामुळे आदिवासी महिलांच्या व बालकांना धोका निर्माण झाला आहे.

रमाकांत वळवी
लाभार्थी महिलेचे पती

*प्रतिक्रिया*** 
                ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे अंडी निकृष्ट असल्याची तक्रार तळवे गावातून प्राप्त झाली आहे. याबाबत संबधीत विभागास सूचना दिल्या असून बुधवारी सकाळी गावात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करणार आहेत...

गटविकास अधिकारी
     रोहिदास सोनवणे

*प्रतिक्रिया***
                  अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत आहाराची खरेदी ही अंगणवाडी स्तरिय आहार समिती करीत असते, प्राप्त तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

भाऊसाहेब बोरकर 
महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी तळोदा

0 Response to "गर्भवती महिलांनी देण्यात आलेले अंडी निकृष्ट दर्जाचे : अंडी खावुन दाखवण्याचे गटविकास अधिकारी यांना आव्हान"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article