
मागील भांडणाचे कुरापत काढून मोबाईलवरून शिवीगाळ ; न्यूबन येथील घटना
तळोदा : मागील भांडणाचे कुरापत काढून एकास मोबाईलवर बोलुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली घटना रविवारी घडली याप्रकरणी पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तळोदा तालुक्यातील न्यूबन येथील अजय राजकुमार ठाकरे यास मागील भांडणाची कुरापत काढून मोबाईलवररून हिम्मत असेल बोरद पेट्रोल पंपावर जवळ या आले तर तुमचे हातपाय तोडून टाकू असे राजू सुरेश ठाकरे रा.न्यूबन ह.मु. परिवर्धे यांनी म्हणत शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिं.13 रोजी घडली म्हणूनअजय ठाकरे यांनी तळोदा पोलिसात फिर्याद दिली दिं.15 रोजी राजू ठाकरे यांच्या विरोधात पनाका रजि नं 147/2021 भादवी कलम 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास पो.हे.कॉ.लक्ष्मण कोळी हे करीत आहे..
0 Response to "मागील भांडणाचे कुरापत काढून मोबाईलवरून शिवीगाळ ; न्यूबन येथील घटना"
टिप्पणी पोस्ट करा