संपर्क करा

रेवानगर येथे जि. प अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

रेवानगर येथे जि. प अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

तळोदा : तालुक्यातील रेवानगर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांच्याहस्ते अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
               मागील 5 ते 6 वर्षापासून रेवानगर येथील जुन्या अंगणवाडीच्या तडे गेले होते.पावसाळ्यात पाणी गळत असल्याने बालकांची देखिल गैरसोय होत होती.  अंगणवाडी सेविका ज्योती पावरा हिने अंगणवाडी बालकांना स्वतःच्या घरात बसवायला सुरुवात केली होती. याबाबत  स्वता विद्यमान सरपंचांकडे तक्रार देखिल केली होती.       रेवानगरच्या सरपंच हिरालाल पावरा यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याकडे याबाबत व्यथा व्यक्त केली होती. त्याची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी जनसुविधेअंतर्गत चार महिन्यात अंगणवाडीला मंजुरी दिली.  
          बुधवारी या नवीन अंगणवाडीच्या बांधकामाचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सरपंच हिरालाल पावरा,उपसरपंच संगीता पावरा,ग्रा,प,सदस्य शकीला पावरा,दिलीप पावरा, निशाताई वळवी ,कैलास दादा,  चिमा पावरा,जेठ्या पावरा,नाथ्या पावरा,डेमच्या पावरा, दिनेश पावरा,दुलबा पावरा, वसंत पावरा,नगाऱ्या दादा, आपसिंग पावरा,जाण्या पावरा,कोमा पावरा,जोदा पावरा,पोड्या पावरा, नायका पावरा ,बुल्ला पावरा,लोट्या पावरा, ग्रामसेवक दिलीप आप्पा,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते..
फोटो : रेवानगर येथे जनसुविधेअंतर्गत अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन करतांना जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी,सोबत सरपंच हिरालाल पावरा,उपसरपंच संगीता पावरा,आदी....

0 Response to "रेवानगर येथे जि. प अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article