संपर्क करा

पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत 33 विषयांना मंजुरी

पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत 33 विषयांना मंजुरी

तळोदा : पालिकेची सर्व साधारण सभा आज ऑन लाई (व्हिडीओ कॉन्फररिंग) द्वारे घेण्यात आली या बैठकीत एकूण ३३ विषयावर चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. 
              तळोदा नगर परिषद येथील दि.२५ जून २०२१ रोजी आयोजित सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष अजय परदेशी यांनी तळोदा शहराच्या विकास कामास विविध ठराव मांडले व त्या सर्वच ठरवाना सर्वांनुमते मंजूरी देण्यात आली.

         अभियंता यांच्या अहवाल अमरधामच्या जागेत गॅस शवदाहीनी खरेदी करुन बसविणे कामी प्रशासकीय मंजूरी दिली. सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पुढील विकास कामे प्रस्तावित करण्यात आले. त्यात डी.बी.हट्टी अक्कलकुवा रोड वरील खर्डी नदीचा जुना पूल तोडून नविन पूलाचे बांधकाम करणे, डी.बी.हट्टी पासून वळण रस्त्यापावेतो रस्त्याचे डांबरीकरण, दुभाजक, फुटपाथ व गटार बांधकाम करणे, विद्यानगरी मधील उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण करणे, मिरा गोपाळ नगर,  श्रेयस काँलनी, प्रताप नगर, श्रीराम नगर, यमुना नगर, गंगाई नगर, शर्मा नगर, भिकाभाऊ नगर, तापी माँ नगर मधील रस्ते व गटारी बांधकाम करणे, गुरुकुल काँलनी रस्ता डांबरीकरण, गटार बांधकाम करणे, दत्त काँलनी रस्ता डांबरीकरण, गटार  बांधकाम करणे. नगर परिषद फंड, आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत पुढील विकास कामे प्रस्तावित करण्यात आले. 
नविन पोस्ट ऑफिस ते योगेश साळी, ईश्वर जोहरी ते तलाव पावेतो रस्ता काँक्रिटीकरण व गटार बांधकाम करणे. धानकावाडा, रामगढ अंतर्गत गटार दुरुस्ती व गटारीवर स्लॅब टाकणे. सुवर्ण जयंती नगरोत्थान, गिरीधर आप्पा नगर, चाणक्य नगर मधील मोकळ्या जागेत सामाजिक सभागृह, बगीचा विकसित करणे. आमदाराच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत पुढील विकास कामे प्रस्तावित करण्यात आले. तळोदा नगर परिषद कार्यक्षेत्रात ओपन जीम साहित्य बसविणे, तळोदा नगर परिषद कार्यक्षेत्रात १० ठिकाणी व्यायाम शाळा बांधकाम करणे. शहरातील नागरिकांसाठी २ लाख रक्कमेच्या अपघाती विमा काढणे प्रस्तावित करण्यात आले. शहरातील दिव्यांग नागरिकांना सन २०२०-२१ सानुग्रह अनुदान वितरित करणे अश्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

              नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्यधिकारी सपना वसावा  तसेच सभा कामी  सचिन पाटील, संगणक अभियंता, नितीन शिरसाठ, अश्विन परदेशी, राजेंद्र माळी यांनी सहकार्य केले. 

 शिवसेना नगरसेविकाने व्यक्त केली नाराजी
           आजच्या सभे बाबत शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी सर्व साधारण सभेतील प्राप्त अजेंड्यावर व कार्यलीन टिपणी वर नगर पालिकेचे अधिकारी हे मोघम स्वरूपाचे विषय घेऊन नगर सेवकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासंबंधी वारंवार तोंडी सांगून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे आढळून आल्याने आज नगर सेविका प्रतीक्षा जितेंद्र दुबे यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा याना लेखी निवेदन देऊन संबधीत पालिका कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली. आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिग मिटींग मध्ये कोणताही विषयावर चर्चा झाली नाही आमचा आवाज जात नव्हता व समोरच्या व्यक्तीचा आवाज येत नसल्यामुळे काही समजले नाही असे सांगून नाराजी व्यक्त केली...

0 Response to "पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत 33 विषयांना मंजुरी "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article