तत्कालीन जिल्हाधिकारी कलशेट्टीचा निधनाचा सोशल मीडियावरील संदेश चुकीचा : कलशेट्टीची प्रकृती ठणठणीत
तळोदा : नंदुरबार चे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्या भूजल सर्वेक्षणचे संचालक असलेले डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांचे निधन झाल्याचा कोणीतरी खोडसाळपने संदेश सोशल मीडियावर पाठवला होता. या वृत्तानंतर खडबड उडून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याना धक्काच बसला. सोशल मीडियावर याबाबत श्रद्धांजली काही जणांनी वाहिली तर काही जनांचा या संदेशवर विश्वास बसत नव्हता. याबाबत यथार्थवार्ताने डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी संपर्क करून तपास केला असता त्यांनी त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय अश्या चुकीच्या व अफवा प्रसरविणाऱ्या संदेशला बळी पडू नये.
नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रकृती ठणठणीत आहे. कोणीतरी नंदुरबार जिल्ह्यात चुकीचा संदेश टाकला आहे . त्याच्यामुळे गैरसमज झाला आहे. हा गैरसमज दूर करावा असा आग्रह त्यांच्या चाहत्यांनी केली.
दि.२७ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील विविध व्हॉटसअप ग्रुप वर डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे निधन झाल्याचे मॅसेज फिरत होते.या मॅसेज वर कुणीही विश्वास ठेवू नये.
डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या कार्यपद्धतीमुळे अगदी कमी क्षणातच ते लोकप्रिय झाले आहे. त्यांचा कामाची प्रचिती ही नंदुरबार जिल्ह्यावासीयांसाठी अगदी सामन्यातला सामान्य माणूस परिचित आहे. सर्वसामान्य माणूस ही त्यांना जुडला गेला असल्याने त्यांच्याबाबत प्राप्त झालेला चुकीचा संदेशामुळे अनेकांच्या भावना गहिवरून आल्या. अनेकजण आजही प्रत्यक्ष संपर्कात असल्याने त्यांच्या मोबाईल खणावून पहिला तर प्रत्यक्ष डॉ.कलशेट्टी साहेब बोलत असल्याने त्यांनी आश्चर्यही झाले. देवाचे आभार मानून अनेकांनी त्यांच्या प्रकृती स्थिर रहावी आणि आयुष्यमान वाढावे म्हणून याप्रसंगी शुभेच्छा दिल्यात.
हल्ली सोशल मीडिया च्या जाळ्यात अश्याप्रकारचे संदेश फिरत असतात कारण नसताना कोणीतरी सत्याच्या पलीकडे जाऊन संदेश तयार करतो आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकतो त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ही संभ्रम स्थिती प्रत्येकाला परिचित असेलच परंतु ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे...
0 Response to "तत्कालीन जिल्हाधिकारी कलशेट्टीचा निधनाचा सोशल मीडियावरील संदेश चुकीचा : कलशेट्टीची प्रकृती ठणठणीत"
टिप्पणी पोस्ट करा