
तालुक्यातील प्रतापपुर गावात लसीकरण जनजागृती रॅली
तळोदा:- तालुक्यातील प्रतापपुर गावात लसीकरण जनजागृती रॅली काढण्यात आली.
तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथे लसिकरण मोहीमंतर्गत प्रतापपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.राॅकेश पावरा व राणा प्रताप स्कूल चे मुख्याध्यापक लक्ष्मण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र प्रमुख श्रीमती आर. बी. निकुंबे, श्रीमती आर.व्ही.वळवी, श्रीमती अश्विनी पावरा, रा.प्र.इग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षिका , जि.प.शाळेतील सर्व शिक्षिका सहभागी होते आणि गावातील लोकांनी प्रतिसाद दिला..
0 Response to "तालुक्यातील प्रतापपुर गावात लसीकरण जनजागृती रॅली"
टिप्पणी पोस्ट करा