संपर्क करा

शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी 60 लाख मंजुर                                           आ. राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतून शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांच्या सुटतील समस्या

शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी 60 लाख मंजुर आ. राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतून शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांच्या सुटतील समस्या

तळोदा:  शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांमधील शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या पाणंद ( शेतशिवार ) रस्त्यांच्या कामासाठी आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या निधीतून 60 लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून यातून 20 रस्ते घेण्यात आले आहेत. साहजिकच शेतकर्‍याच्या शेत रस्त्यांच्या प्रश्नी मार्गी लागणार आहे.आमदार निधीतून पाणंद रस्त्यांसाठी निधी खर्च करणारे जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

           शहादा तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांशी त्यांच्या प्रश्नासाठी प्रत्यक्ष संवाद साधला तेव्हा अनेक गावांमधील शेतकर्‍यांनी शेत शिवराला जोडणार्‍या रस्त्यांच्या प्रश्न उपस्थित केला होता. रस्त्याअभावी शेतातील मालाची ने, आन करताना अत्यंत कसरत करावी लागत असते.शिवाय मशागतीस देखील अडचण येत असते.त्यामुळे हे रस्ते होणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.
           पाणंद योजना ही राज्याचा महसूल विभागाकडून राबवली जात असते.शिवाय तीस पुरेसा निधीही नसतो.साहजिकच स्थानिक महसूल प्रशासन मागणी आलेल्या कामांपैकी ठराविक कामांनाच प्राधान्य देत असते.त्यामुळे पुरेशा निधी अभावी ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे प्रचंड असताना मार्गी लागलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. तथापि आ. राजेश पाडवी यांनी शेतकर्‍यांच्या हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या फंडातून निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले.यासाठी त्यांनी साधारण 60 लाखांच्या निधी मंजूर केला आहे.यातून 20 गावांमधील शेतकर्‍यांचे शेत शिवारातील 20 रस्ते घेतली आहेत. यातून 60 किमीचे रस्ते तयार होणार आहेत. प्रत्येक तीन किमीच्या रस्त्यासाठी तीन लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.
               सदर कामांचे नियोजन देखील करण्यात आले असून लवकरच कामे सुरू करण्यात येणार आहेत. शहादा तळोदा तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे परंतू पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे युद्ग पातळीवर पूर्ण करावीत अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

या गावांना घेण्यात आली पानंडची कामे
    शहादा,-तळोदा तालुक्यातील ज्यावीस गावांना आमदार निधीतून पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे त्यात तळोदा तालुक्यात प्रकाशा,धानोरा,तळवे,मोड, दसवड, चिनोदा,रांजणी.तर शहादा तालुक्यात मंदाना, जावदा, असलोद,भोरतेक, वाघारदे,लोहारे, जाम, बहिरम्पुर, लक्कडकोट,मुबारकपूर,कुसुमवाडे ही गावे घेण्यात आली आहेत.यातील बहुतेक रस्ते थेट गावाना जोडणार आहेत.त्यामुळे भविष्यात ती मोठी रस्ते होवून डांबरीकरणाचे देखील होवू शकतील.शिवाय ते बारमाही जोडली जाणार आहेत.केवळ तीन किमी च्या रस्त्यामुळेच रखडली होती.आता पाणंद रस्त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

0 Response to "शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी 60 लाख मंजुर आ. राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतून शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांच्या सुटतील समस्या"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article