
एके दिवशी शासकीय सेवेतून निवृत्त व्हावेत लागते- गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे
तळोदा:- एके दिवशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निवृत्त व्हावे लागते त्यामुळे सर्वांनी आपली कामे प्रामाणिकपणे व चोखपणे पार पाडावीत असे प्रतिपादन तळोदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी केले.
तळोदा येथील शिक्षण विभागांतर्गत गट साधन केंद्र तळोदा येथे निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचार्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तळोदा पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, अर्जुन वळवी गट शिक्षण अधिकारी एस. एम. धनगर उपस्थित होते. त्याप्रसंगी गटविकास अधिका
री रोहिदास सोनवणे बोलत होते. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी. वसावे, केंद्रप्रमुख शारदा गायकवाड, हिरामण गायकवाड यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त झालेल्या तिघाही सत्कार मूर्तींनी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, अर्जुन वळवी, गटविकास अधिकारी सोनवणे, यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
याप्रसंगी सत्कारमूर्ती डी. जी. वसावे, केंद्रप्रमुख शारदा गायकवाड, यांनी सेवेत असताना आलेले अनुभव कथन केले या कार्यक्रमाला तळोदा पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बी.के. पाटील, लेखा अधिकारी जाधव, केंद्रप्रमुख श्रीमती गोदावरी पाटील, श्रीमती अलका जयस्वाल, सुकलाल पावरा गट साधन केंद्रातील कर्मचारी रावसाहेब पाटील, श्रीमती शर्मिला चौधरी, शकील काझी, नंदू पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीमती रंजना निकुंबे यांनी तर आभार केंद्रप्रमुख जगन्नाथ मराठे यांनी मानले...
0 Response to "एके दिवशी शासकीय सेवेतून निवृत्त व्हावेत लागते- गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे "
टिप्पणी पोस्ट करा