पंचायत समितीच्या सभागृहात सभापती यशवंत ठाकरे अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, उपसभापती लता वळवी प.स सदस्य विजयसिंग राणा, इलाबाई पवार,सदस्य सुमन वळवी, पस.सदस्य चंदन पवार, विक्रम पाडवी यासह विविध विभागाचे विभागा प्रमुख उपस्थित होते. ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी के.बी.पाटील, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, ग्रामीण पाणीपुरवठाचे कनिष्ठ अभियंता राहुल गिरासे, लेखा विभागाचे संजय चौधरी, आरोग्य विस्तार अधिकारी वाघ, बांधकाम विभागाचे उपअभियंता पवार, लघुसिंचन विभागाचे पवार, कृषी विभागाचे राजेंद्र सावळे, पशु संवर्धन विभाग डॉ.गोस्वामी, तालुका कृषी विभाग, वीज वितरण विभाग, परिवहन महामंडळ, आदिवासी प्रकल्प विभाग, विद्युत वितरण बोरद क्षेत्र या विभागाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एन पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवड मोहीमेस गती देने गरजेचे असताना सामाजिक वनीकरण विभाग, मेवासी वन विभाग, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख यावेळी गैरहजर असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधिताना नोटीस बजावण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
याशिवाय घरकुलाबाबत, कोव्हीड लसीकरण जनजागृती बाबत, समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगाना साहित्य वाटपाच्या नियोजनसह विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. बोरद प्राथमिक आरोग्य केंद्र या चर्चेचा विषय ठरला, दरम्यान मागील 4 दिवसापूर्वी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात बोरद येथील एका गरोदर मातेच्या दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेस जबाबदार कोण ? असा प्रश्न पंचायत समिती सदस्य विजय राणा यांनी उपस्थित केला. यावर आरोग्य विभागाचे हजर असलेले कर्मचारी यांना समर्पक उत्तरे देता आली नाही, वेळीच गटविकास आधिकारी सोनवणे यांनी संबंधित घटनेची चौकशी करणाऱ्याचे आदेश दिले. येणाऱ्या काळात अश्या घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणे बाबत सूचित केले.
विशेष म्हणजे जुलै महिन्यात सर्व सामान्य जनतेचा कल हा वृक्ष लागवडीकडे असतो परंतु या महत्वाच्या बैठकीला सामाजिक वणीकरण व मेवासी वन विभागाचे कोणीच प्रतिनिधी उपस्थित नव्हते याबाबत सभेत नाराजी व्यक्त केली.
यासोबतच पंचायत समिती बांधकाम विभाग, अर्थ विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, लघु सिंचन विभाग, महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग, समाजकल्याण, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, पशु संवर्धन विभाग, लेखा विभाग, विद्युत वितरण विभाग,परिवहन विभाग,आदिवासी विकास प्रकल्प, प्रमुखांनी आपापला कामाचा प्रगतीचा आढावा दिला. बैठकीस सामाजिक वनीकरन व मेवासी वनविभागाचे प्रतिनिधी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तळोदा क्रमांक 1 हे गैरहजर असल्याने याबाबत नाराजी व्यक्त करून संबंधीताना नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...
0 Response to "पंचायत समिती मासिक सभेत : पुन्हा त्या तीन विभागाचे पदाधिकारी गैरहजर"
टिप्पणी पोस्ट करा