
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तळोद्यात स्व:खर्चाने काढले 678 कुटुंबियांचे विमे
तळोदा : शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त तळोदा शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रत्येक 678 कुटुंबातील कुटुंबप्रमुखाच्या विमा स्वखर्चाने सामाजिक बांधिलकी म्हणून शिव सेनेच्या खर्चाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढून देण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
कोरोना या जागतिक महामारीने अनेक कुटुंब उध्दवस्त केली आहेत. अनेक कुटुंबीयांनी आपल्या कुटूंबातील प्रमुख कर्ता पुरुष किंवा महिलेला गमावले आहे. अनेकदा कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा स्त्री गमावल्यानंतर त्या कुटुंबियांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले आहे. या अनुषंगाने खबरदारी व दिलासा म्हणून शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून तळोदा शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रत्येक कुटूंब प्रमुखाचा पंतप्रधान जीवन ज्योतीचा विमा स्वखर्चाने काढण्याचा उपक्रम शिवेसनेने हाती घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ आज कलाल समाज वाडीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला..
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, उपजिल्हा प्रमुख रुपसिग पाडवी, तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, जिल्हा संघटक राम वाडीले, तालुका संघटक आकाश वळवी, पत्रकार संघाचे सचिव उल्हास मगरे, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, पाणीपुरवठा सभापती नंदुरबार कैलास पाटील,अक्कलकुवा शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी, नंदुरबार जिल्हा संघटक अक्कलकुवा राम वाडीले, खापर येथील उपसरपंच ललित जाट, आदि उपस्थित होते.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी याप्रसंगी सांगितले की, कोरोनाच्या भयावह परिस्थितीत माणूसकी हरवली होती. माणसाला पाहून माणूस पळत होता. अश्या संकटाच्या काळात शिवसैनिकानी जनतेची सेवा केली आहे. कोरोनासारख्या अवघड परिस्थितीत रेमडीसीविर मिळविण्यासाठी मालेगाव, जळगाव, नाशिक, धुळे अश्या विविध शहरात जाऊन त्यांनी शहरवासीयांना इंजेक्शन उपलब्ध केले. शिवसेना आता ग्रामीण भागासह घराघरात पोहचवायची आहे. नंदुरबार येथे देखील नागरिकांचा एक लाखाचा अपघाती विमा उतरविल्याचे राम रघुवंशी यांनी यावेळेस सांगितले..
शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी देखील तळोदा येथील शिवसेनिकांचे कौतुक केले. शिवसेनेचे आनंद सोनार यांनी तळोदा नगरपालिकेचे सत्ताधारी झोपा काढत आहेत का ? त्यांना आता तरी जागे व्हावे व जनतेच्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने कार्य करावे असे आवाहन दिले.
विमा काढून घेण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेनेचा नगरसेविका प्रतीक्षा दुबे, युवा सेना शहर प्रमुख जगदिश चौधरी, शहर संघटक विनोद वंजारी, सूरज माळी, कल्पेश माळी, उप शहर प्रमुख श्रावण तिजविज, विजय मराठे नितीन ठाकरे, जयेश माळी, दिपक मोरे, कुलदिप वाघ, सुदर्शन कर्णकार, अक्षय कर्णकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल शहर संघटक विनोद वंजारी, जगदीश चौधरी, यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.. पहिल्याच दिवशी 678 कुटुंबियातील कुटुंब प्रमुखाचा विमा काढण्यात आला. प्रास्तविक शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी तर आभार प्रदर्शन आनंद सोनार यांनी मानले...
0 Response to "शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तळोद्यात स्व:खर्चाने काढले 678 कुटुंबियांचे विमे"
टिप्पणी पोस्ट करा