संपर्क करा

चिनोदासह परिसरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा ; पेरण्याही खोळंबल्या 

चिनोदासह परिसरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा ; पेरण्याही खोळंबल्या 

तळोदा : चिनोदासह परिसरात अजून पर्यत पावसाने हजेरी लावलेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. साधारणतः जून मध्ये पाऊस पडेल या आशेने शेतकरी पुढचे पीक घेण्यासाठी शेतात नांगरणे, वखरणे, रोटा मारणे, कलटीव्हेटर करणे, शेतातील काळीकचरा वेचणे, शेतात शेणखत टाकणे


, पिकांना पाणी देण्यासाठी चार्‍यांची व्यवस्थित बांधणी करणे आदी शेतीची कामे करण्यात आली. 

         तसेच वेळोवेळी अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी शेतातील टरबूज, केळी, पपई, गहू आदींसह इतर पिकांच्या उत्पन्नात घट तसेच भाव नसल्याने अक्षरशः शेतकऱ्यांचा खर्च देखील निघाला नाही. तरीही जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगाम चांगला जाईल या आशेने शेतात राबत आहे. मात्र जून महिना अर्धा संपत आला तरी पाऊस नसल्याने चिनोदासह परिसरातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत. 
         तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा बर्‍याच शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली असून उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र पेरणी साठी दमदार पाऊस झाला नसल्याने त्यामुळे अजून पेरणीसह कापूस लागवडही लांबणीवर पडली आहे. रोज सकाळी ते दुपारपर्यत वातावरणात असह्य उकाडा जाणवतो. परंतू सायंकाळी मात्र वातावरण मोकळे होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
      मृग नक्षत्रात सुध्दा पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोंळबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून कडक उन्हामुळे सगळेच दमदार पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत. मात्र अजून पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्यामुळे चिनोदा परिसरातील नागरिक उकड्याणे हैराण झाले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांसह लहान बालकांचे हाल होत आहेत. सध्या ढगाळ वातावरण असल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसह चिनोदा परिसरातील शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची प्रतिक्षा करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

0 Response to "चिनोदासह परिसरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा ; पेरण्याही खोळंबल्या "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article