
बोरद येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेले: तळोदा पोलिसात गुन्हा दाखल
तळोदा:- तालुक्यातील बोरद येथील17 वर्ष 7 महिने वयाच्या तरुणीस दिं. 10जून ते 11 जून मध्यरात्री कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार तळोदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीची आईने तळोदा पोलिसात फिर्याद दिली आहे. दिं.10 जून च्या रात्री 11:30 वाजता ते 11 जून रोजी मध्यरात्री 1:30वाजेच्या दरम्यान राहते घरातून 17 वर्ष 7 महिने वयीन तरुणीला अज्ञात इसमाने पळवून नेले पोलिसात अज्ञात इसमाचा विरोधात फौ. गु.र.नं. 371/2021 भादवी कलम 363 प्रमाणे दाखल झाला असून पुढील तपास सपोनि अमितकुमार बागुल हे करीत आहेत..
0 Response to "बोरद येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेले: तळोदा पोलिसात गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा