तळोदा : केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि भारतीय कृत्रिम अंग निगमच्या (एलिम्को) वतीने दिव्यांगांना उपलब्ध झालेल्या साहित्याचे वाटप कार्यक्रम बुधवारी तळोदा पंचायत समितीत आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी देखिल उपस्थित राहणार होते.मात्र ऐनवेळी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमुळे लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे कार्यक्रमच रद्द करावा दिव्यांग बांधवांना मनस्ताप सहन करावा लागला.कार्यक्रमासाठी दिव्यांग बांधवाना एक दिवस अगोदर फोन करून बोलविण्यात आले,मात्र ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांना कळविण्यात न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दिव्यांगांना अडचणींवर मात करता यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहता येण्यासाठी शासनाकडून दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून विविध साहित्य वाटप केले जाते. दिव्यांग व्यक्तींसाठी हा मोफत सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रम येथील तळोदा पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात बुधवार दि 23 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री, आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी व इतर जिल्ह्यातील अधिकारी व मान्यवर उपस्थितीत राहणार होते. मात्र,मंगळवार दि २२ जून नंदुरबार जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे लोकप्रतिनिधी व राजकिय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पाडणारा हा कार्यक्रम प्रशासनाला ऐनवेळी रद्द करावा लागला.
असे असले तरी या सर्वांचा मनःस्ताप दिव्यांग बांधवाना सहन करावा लागला.कार्यक्रमाला साहित्य घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे,यासाठी पंचायत समिती प्रशासनाने बुधवारी दि.२२ रोजी दिवसभर पात्र लाभ्यार्थ्याशी फोन द्वारे अथवा शक्य होईल त्या पद्धतीने संपर्क करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यानुसार अनेक लाभार्थी उपस्थित सुद्धा राहिले.मात्र,आचारसंहिता मुळे कार्यक्रमच रद्द झाल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली.आधीच दिव्यांग बांधव इतरांची मदत घेऊन कार्यक्रमस्थळी हजर झाले होते.त्यातच कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांना मनःस्ताप सहन करावा लागला.आचारसंहितामुळे रद्द होणार हे लक्षात घेऊन दिव्यांग लाभार्थ्यांना सकाळी लवकर कळवून दिले असते तर त्यांची गैरसोय झाली नसती,असे दिव्यांग बांधवांचे मत होते.
....आणि बीडीओना फुटला घाम
बुधवारी पंचायत समितीच्या आवारात कार्यक्रम ऐनवेळेस आचारसंहितेमुळे रद्द करावा लागल्याने लाभार्थ्यांची गैरसोय झाली परंतु काही लाभार्थ्यांनी कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल लोकप्रतिनिधींना संपर्क करून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली यामुळे काही लोकप्रतिनिधींनी द्वारे संपर्क करून कार्यक्रम घेण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली काही लोकप्रतिनिधी कार्यक्रम घेण्यासाठी पिढ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रकारामुळे पंचायत समितीच्या बीड यांची चांगलीच गोची झाली.त्यामुळे त्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारीशी संपर्क करुन याबाबत मार्गदर्शन मागितले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार व्हिडिओनी कार्यक्रम घेण्यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना शासनाचे व जिल्हा परिषद कडून प्राप्त झालेले पत्राची प्रत व्हाट्सअपद्वारे पाठवण्यात आली या प्रकारामुळे बीडीओंना चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले.
या साहित्याचे होणार होते वाटप
या कार्यक्रमात १३० दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल (बॅटरीवाली किंवा हाताची) कुबड्या, हाताने बसून चालवायची दुचाकी (व्हीलचेअर), आधार काठी, कृत्रिम हात-पाय, बधीर व्यक्तींना श्रवण यंत्रे, अंध व्यक्तिंना लेझर सेंन्सर उपकरणे, ब्रेल लिपीतील मोबाईल व इतर किट, गतीमंद व्यक्तिंना आधुनिक किट दिले उपलब्ध करून दिली जाणार होते. आता साहित्य वाटपाचा कार्यक्रम आचारसंहितेनंतर होणार असल्याचे समजते.
प्रतिक्रिया***
आचार संहिता असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला रात्री उशिरा पावेतो या बाबतीत वरीष्ठच्या संपर्कात होतो, लाभार्थी अधिक असल्याने प्रत्येकाशी संपर्क होवू शकला नाही. आचार संहिता संपताच वरिष्ठच्या मार्गदनाने साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल.
रोहिदास सोनवणे
गट विकास अधिकारी तळोदा
प्रतिक्रिया***
तालुक्यातील खेड्या पाड्यातुन अपंग लाभार्थी सकाळी आले होते ज्यांना चालता येत नाही उभं राहतं येत नाही त्यांना हाल अपेष्टा सहन करत इथवर यावं लागलं मात्र आचार संहिता असल्याने कार्यक्रम घेता येणार नाही हे नियमात बसणारे आहे मात्र अधिकारी वर्ग वाटप करू शकला असता मात्र त्यांनी वाटप केलं नाही हे चुकीचे आहे.
मंगल जैन
तालुका अध्यक्ष दिव्यांग
(अपंग) क्रांती संघटना तळोदा
0 Response to "ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याने दिव्यांग बांधवांना सहन करावा लागला मनःस्ताप"
टिप्पणी पोस्ट करा