संपर्क करा

आधी आरक्षण जाहीर करा मगच निवडणुका घ्या : खासदार रक्षा खडसे

आधी आरक्षण जाहीर करा मगच निवडणुका घ्या : खासदार रक्षा खडसे


 तळोदा : नंदुरबार जिल्हातील ११ ओबीसी जि.प.सदस्यांचा पोटनिवडणूका या राज्यसरकारच्या चुकीचा धोरणामुळे असून याला राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे अगोदर ओबीसी आरक्षण जाहीर होऊ द्या नंतर निवडणुका घ्या .या बाबतीत भाजपचे वरिष्ठ नेते राज्यपालांना भेटले असून या बाबतीत त्यांचा कडे दाद मागितली आहे,अशी माहिती तळोदा येथे आयोजित मेळाव्यात खासदार रक्षा खडसे यांनी बोलतांना दिली.
           तळोदा येथिल आदिवासी सांस्कृतिक भवनात  खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्हा भाजपाच्या कार्य समोतीची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीला खासदार डॉ हिना गावित, आमदार राजेश पाडवी,पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, नगराध्यक्ष अजय परदेशी, उप नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी राजेंद्र गावीत,सातपुडा साखर कारखानासाजे चेअरमन दिपक पाटिल,प्रदेश कार्य समिती सदस्य नागेश पाडवी, भरत गावित, हेमलाल मगरे,तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी,अनुसूचित जाती मोर्चाचे डॉ, स्वप्नील बैसाने, रामानंद ठाकरे, अंबिका शेंडे ,अमोनॉद्दीन शेख, ओबीसी मोर्चा जिल्हा युवा अध्यक्ष एजाज शेख आदी उपस्थित होते.
        रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की, नंदुरबार जिल्हा परिषदेतील एकूण ११  ओबीसी उमेदवारांचे चुकीच्या धोरणामुळे पद गमावावे लागले असून सत्तेत बसणारे ओबीसी नेते आज ओबीसी आरक्षणाबद्दल केवळ बोलतात. मात्र ते आवश्यक कागदपत्रे न्यायालयात दाखल करू शकले नाही.आरक्षण पासून लांब कस करता येईल या साठी  सरकार डाव आखत आहेत.त्यामुळे ओबीसी बांधवाचे स्थानिक स्वराज संस्थेत आरक्षण धोक्यात आले आहे.सध्याचे राज्य सरकारने कोणतेच निर्णय घेतले नाही फक्त घोषणाबाजी कोणतेही ठोस योजना नाही, खावटी कर्जाची अंमलबजावणी अजूनपर्यत व्यवस्थित झालेली नसल्याचे त्या म्हणाल्या...
          जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी,  यांनी बोलतांना सांगितले की,जिल्हा अध्यक्ष म्हणजे काटेरी  मुकुट असून संघटन साठी सर्व बाबी कराव्या लागतात,मुख्यमंत्री यांच्या चुकीचा धोरणामूळ ओ,बी,सी, आरक्षण गेलं , जनतेच्या पाठीशी खंजीर खुपसत अभद्र आघाडी केली.ओबीसी च्या विरोधतील सरकार आहे. येणाऱ्या २६ तारखेला ओबीसी आंदोलनाचे स्वरुपाबाबात त्यांनी माहिती दिली.
           भाजप शहर कडून पंडित श्यामा प्रसाद मूखर्जी २३ जून स्मृतिदिन व ६ जुलै   दरम्यान विविध कार्यक्रम जिल्हात राबविले जाणार आहेत,असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.सूत्र संचलन कौशल सवाई,आभार प्रदर्शन संघटन सरचिटणीस राजेंद्र गावीत यांनी केले. 

0 Response to "आधी आरक्षण जाहीर करा मगच निवडणुका घ्या : खासदार रक्षा खडसे"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article