तळोदा शहरात होणार्या अतिक्रमणाकडे पालिकेचे दुर्लक्ष : भील्लीस्थान टायगर सेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
तळोदा : नगरपालिकेने जुन्या सरकारी दवाखाना व धान्य मार्केट या जागेवर राजकीय पक्षाचा संबंधित आजी-माजी पदाधिकारी यांच्या संबंधित व्यक्तींनी ताबा केल्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चुप ची भूमिका घेऊन राजकीय पुढारी या विषयात सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नव्याने बांधलेल्या व्यापारी संकूलामध्ये देखील राजकीय व त्यांचा हीत संबंधातील व्यक्तींनी अनधिकृत ताबा केल्याचे निवेदन भील्लीस्थान टायगर सेनेने आज मुख्याधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की नगरपालिकेने नव्याने बांधण्यात आलेल्या संकुलातील गाळे कोणताही लिलाव न करता हितसंबंध जोपासण्यासाठी अनधिकृतपणे लोकांना वापरासाठी दिलेले तसेच नवीन संकुला समोर विविध दुकानांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे भाजी बाजारात जाताना रहदारीस देखील अडचण होत आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये भांडणे देखील होत असतात तसेच बेकायदेशीर नगरपालिकेची जागा बेकायदेशीर वापरली जात असल्यामुळे नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.
तळोदा शहरात बरेच आदिवासी बांधव व इतर बांधव सुशिक्षित असून बेरोजगार आहेत तरी सदर गाळे कायदेशीर लिलाव झाल्यास सुशिक्षित बेरोजगार युवकांना हे गाळे लिलावात मिळाल्यास त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो तरी नगरपालिकेने या विषयाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर गाळे लिलाव करावे जेणेकरून नगर पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर खालील पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत दिलीप पावरा बी टी एस तालुका प्रमुख राजू प्रधान जिल्हा प्रवक्ता मंगल पाडवी युवा जिल्हा उपाध्यक्ष सतीश ठाकरे बियालाल पावरा हितेश गुलाले मंगल पाडवी जितेंद्र केदार तळोदा तालुका उपाध्यक्ष रोशन पाडवी युवा उपाध्यक्ष कैलास धानका अर्जुन पावरा योगेश पाडवी शहर अध्यक्ष विनोद पाडवी राकेश पाडवी सागर पाडवी विशाल पाडवी आदींच्या सह्या आहेत.
मा,मुख्याधिकारी मॅडम लवकरात लवकर ऍकशन घेतील ही अपेक्षा आहॆ,
उत्तर द्याहटवा