तळोदा: शहरातील शहादा रस्त्यालगत असणाऱ्या सर्व नवीन वसाहती मध्ये रस्ते, गटार, विद्युत पथदिवे नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. तसेच पावसाळ्यात अनंत अडचणीचा सामना करावा लागतो तसेच विद्युत पंथदिवे पुरेसे नसल्याने काही भागात अंधार असतो या बाबतीत नवीन वसाहती मधील रहिवाशी नागरिकांनी आमदार राजेश पाडवी यांची त्यांचा निवासस्थानी भेट घेऊन साकडे घातले व या बाबतीत चर्चा करून निवेदन दिले,
दरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी पावसाळ्यात तात्पुरता स्वरूपात आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकून अडचण दूर करण्याचे सांगत पावसाळ्या नंतर या भागात पक्के रस्ते व गटारी, व विद्युत पथदिवे उभारून नवीन वसाहती मधील मूलभूत सुविधा उपलब्द करून देण्याचे आश्वासन दिले, तसेच इतरही समस्या जाणून घेतल्या चेतन चव्हाण अरुण महाजन, विश्वनाथ गायकवाड, संदीप पटेल संदीप चौधरी, पुष्पेंद्र राजपूत, प्रकाश वानखेडे, संतोष जावरे, रघुवीरसिह कुवर, निलेश चिंचोले, लक्ष्मीकांत शेंडे, योगेश चव्हाण, पंकज गुजराथी, संतोष जावरे, मुकुंद वाघ, हेमंत मराठे, पंकज मोरे, कांतीलाल पाटील, तापी माँ नगर जगन्नाथ जोशी नगर, रविहंस नगर, काशीराम नगर, शंकर नगर, भगवान सीताराम नगर, पिठाई नगर, पुनाबाबा नगर, राजकुळे नगर, दामोदर नगर, सिताई नगर, सुशीला श्रीराम पार्क, पार्वती रामदास पार्क, शिवगंगा नगर गणेश नगर आदी परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
0 Response to "तळोद्यातील नवीन वसाहती रस्ते, गटार, पथदिव्याविना रहवाश्यांचे आमदारांना साकडे; मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आ.पाडवीचे आश्वासन"
टिप्पणी पोस्ट करा