संपर्क करा

ऊस पिकाचे संगोपनासाठी खटाटोप शेतकरी हतबल : पावसाची प्रतिक्षा 

ऊस पिकाचे संगोपनासाठी खटाटोप शेतकरी हतबल : पावसाची प्रतिक्षा 


तळोदा : तालुक्यातील रांझणी, रोझवा, पुर्नवसन, पाडळपूर परिसरात कुपंनलिकांची पाणीपातळी चांगलीच खालावल्याने शेतकर्‍यांना ऊस पिकाला पाणी देणे अवघड ठरत असून जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही पावसाची प्रतिक्षाच लागून असल्याने ऊस पिकाच्या संगोपनासाठी शेतकर्‍यांकडून खटाटोप करण्यात येत आहे. 
     या परिसरात गेल्या मे महिन्यातच पाणीपातळी खालावली होती. तरीही शेतकर्‍यांकडून दिवसरात्र स्वतः उभे राहून ऊसाला पाणी दिले होते. तसेच यावर्षी मान्सून वेळेवर हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला गेल्याने शेतकर्‍यांना दिलासा दिला. परंतु नेमका  या परिसरात पावसाने दडी मारल्याने आता ऊस पिकाला पाणी देणे अवघड ठरत असून काही शेतकर्‍यांकडून ठिबक सिंचन करण्यात येत असून तर काही शेतकरी आजूबाजूच्या शेतकर्‍यांकडून पाणी विकत घेऊन ऊसाला पाणी देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान पाणी पातळी खालावल्याने ऊस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून शेतकर्‍यांकडून एकरी उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. 
   
    चौकट
वीज वितरण कंपनीकडून सहकार्य  : परिसरात दिवसा होणार्‍या वीज पुरवठा वेळोवेळी बंद पडणारा विद्युत पुरवठा लाईनमनांकडून वेळोवेळी लागलीच सुरळीत करण्यात येत असून त्याचबरोबर नादुरुस्त टाँन्सफाँर्मर विद्युत वितरण कंपनीकडून बदलून दिले जात असल्याने शेतकर्‍यांकडून समाधान व्यक्त होत आहे.


0 Response to "ऊस पिकाचे संगोपनासाठी खटाटोप शेतकरी हतबल : पावसाची प्रतिक्षा "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article