तळोदा : शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त तळोदा शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाच्या विमा स्वखर्चाने काढण्यात येणार आहे याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी माहिती दिली आहे
कोरोना या जागतिक महामारीने अनेक कुटुंब उध्दव केली आहेत.अनेक कुटुंबीयांनी आपल्या कुटूंबातील प्रमुख कर्ता पुरुष किंवा महिलेला गमावले आहे.अनेकदा कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा स्त्री गमावल्यानंतर त्या कुटुंबाचे प्रचंड हाल झाले आहेत.अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपत आहे.
अशी वेळ कोणावर येऊ नये,परंतु अशी तशी वेळ आलीच तर त्या परिस्थितीत कोणत्याही कुटुंबाचे हाल होऊ नये यासाठी सावध होणे गरजेचे आहे, म्हणून शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून तळोदा शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रत्येक कुटूंब प्रमुखाचा पंतप्रधान जीवन ज्योतीचा विमा स्वखर्चाने काढण्याचा उपक्रम शिवेसनेने हाती घेतला आहे.ज्या व्यक्तीच्या नावाने विमा आहे त्याचा नेसर्गिक किंवा एक्ससिडेंटल मृत्यू झाला तर त्याचा पश्चात त्याचा कुटूंबाला दोन लाख रुपयांपर्यत किंवा त्या पेक्षा जास्त रक्कम ही मिळण्याची तरतूद आहे.
या रकमेमुळे घरातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटूंबाची परवड होणार आहे. या रकमेतून ते कुटुंब व्यक्तीच्या घरातील सदस्याला एक चांगला व्यवसाय सुरू करता येईल व कुटबाचे उदरनिर्वाह करता येईल,या हेतूने शिवसेना हा उपक्रम राबवित असल्याची माहिती शिवसेनेचे तळोदा शहर प्रमुख जितेंद्र दुबे व आनंद सोनार यांनी दिली आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन रविवार दिनांक 19 जून रोजी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने शहरातील खान्देशी गल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी आदींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह १९ जून रोजी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला, असे आवाहन तळोदा शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Response to "तलोद्यात शिवसेना उतरवणार कुटुंबप्रमुखांचा विमा वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा उपक्रम"
टिप्पणी पोस्ट करा