
तळवे येथे निकृष्ट दर्जाचे अंडी मिळत असल्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात भेट देऊन केलो चौकशी
तळोदा : तळवे येथे ए.पी.जे अब्दुल कलाम योजनेअंतर्गत मिळत असलेल्या अंडी निकृष्ट असल्याची तक्रार येथील लाभार्थ्याच्या पतीकडून करण्यात आली होती. या अनुषंगाने अधिकाऱ्यांकडून तळवे गावात प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. दरम्यान लाभार्थ्यांनी अंडी चांगला असल्याचा अभिप्राय लिहून दिला आहे.
तालुक्यातील तळवे गावात ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना देण्यात येणारी अंडी ही सडकी व निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार तेथील रहवासी रमाकांत वळवी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. शिवाय अंडी दाखवण्यासाठी त्यांनी कार्यालयात आणली होती. कार्यालयाच्या आवारात अंडी फोडून अंडी सडकी असल्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते. शिवाय अंडी खावुन दाखविण्याचे आव्हान गटविकास अधिकारी यांना केले होते. या अनुषंगाने संबधीत अधिकारी बुधवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, बालविकास प्रकल्प अधिकारी बोरकर, विस्तार अधिकारी बी.के. पाटील यांनी तळवे गावात प्रत्यक्ष अंगणवाडी क्रमांक 1 येथे भेट देऊन चौकशी केली.
अंगणवाडी सेविका श्रीमती सीमा विश्वास ठाकरे हे उपस्थित होते. खराब अंडी देत असल्याचा आरोपाबाबत विचारणा करून त्यांनी अंडी वाटप रजिस्टरची पाहणी केली. वाटप रजिस्टर नुसार लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रात बोलावले व त्यांच्याकडून लेखी स्वरूपात अंडी खराब नसल्याबाबत त्यांनी अभिप्राय लिहून दिले. वातावरणाच्या बदलामुळे देखील अंडी खराब होतात असे काहींनी सांगितले.
सदर अंडी ही दिनांक 9 जून रोजी खरेदी करण्यात आलेली होती. व त्याच दिवशी वाटप झक्याची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली होती. संबंधित गटविकास अधिकारी यांनी लाभार्थ्यांकडून अंडी मागवून ते फोडून पाहिले असता ते चांगली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आला या अनुषंगाने त्यांनी तसा अहवाल उपस्थित महिला लाभार्थ्यांकडून तसा अभिप्राय त्यांनी नोंदवून घेतला. चौकशी वेळी सरपंच सुरेश बारीकराव, अंगणवाडी सेविका वाणी, वैशाली नाईक, आशिला पाडवी, अनिता नाईक, वाणीबाई ठाकरे मदतनीस व लाभार्थी यावेळी उपस्थित होते...
प्रतिक्रिया ***
तळवे गावात अमृत आहार योजनेचे आहारातील अंडी निकृष्ट मिळत असल्याबाबतची लेखी तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने तळवे गावात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून तेथील रजिस्टर तपासणी केली. लाभार्थ्यांना बोलावून त्यांना विचारपूस केली. अंडी चांगले असल्याबाबत लेखी अभिप्राय लाभार्थ्यांनी नोंदवला आहे.
रोहिदास सोनवणे
गटविकास अधिकारी तळोदा
प्रतिक्रिया :
अंगणवाडी स्तरीय अमृत आहार समिती मार्फ़त पोषण आहार खरेदी केला जातो. त्या माध्यमातून अंडी खरेदी झाली आहेत. ९ जुन रोजी ४८ पाट्या अंडी खरेदी केल्या होत्या व त्याच दिवशी लाभर्थ्यांना वाटप केल्या आहेत, अंडी वाटपाच्या दिवसा पासून तर आज पावेतो तोंडी अथवा लेखी तक्रार आलेली नाही, तक्रारदार हे नियमितपणे तळवे येथे राहत नाहीत. त्यांनी खोटी तक्रार केली आहे.
सीमा ठाकरे
अंगणवाडी सेविका तळवे
0 Response to "तळवे येथे निकृष्ट दर्जाचे अंडी मिळत असल्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात भेट देऊन केलो चौकशी "
टिप्पणी पोस्ट करा