
तळोदा शहर व तालुक्यात दिं.१४ जून रोजी ११ जण कोविड उपचाराअंती बरे झाले.
तळोदा : परिसरात दिं.१४ जून रोजी सायंकाळी पर्यंत ११ जण कोविड उपचाराअंती बरे झाले असून घरी परतले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सातपुते यांनी दिली आहे
नंदुरबार जिल्ह्यात आंनद देणारा अहवाल प्राप्त झाला आहे. दिं.१४ जून रोजी सायं ६ वाजेच्या कोविड-१९ उपचाराअंती एकूण ६९ जण उपचारा अंती बरे झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. तालुका निहाय नंदुरबार तालुक्यात २५ जण, शहादा तालुक्यात- १२ जण, अक्कलकुवा तालुक्यात ०३ जण, नवापूर तालुक्यात- १४ जण, तळोदा तालुक्यात- ११ जण, धडगाव- ०४ जण कोरोना उपचार अंती बरे झाले आहेत..
0 Response to "तळोदा शहर व तालुक्यात दिं.१४ जून रोजी ११ जण कोविड उपचाराअंती बरे झाले. "
टिप्पणी पोस्ट करा