
तळोद्यात सुनेला सासरी बोलविल्याच्या राग येऊन महिलेस दोघांनी मोबाईलवर दमदाटी
तळोदा: सुनेला सासरी बोलविले असता त्याच्या राग येऊन महिलेला मोबाईलवरून शिविगाळ करून दमदाटी केल्याची घटना तळोदा शहरात दिं. 12 रोजी रात्री घडली याप्रकरणी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तळोदा शहरात एकता नगरातील मंगलाबाई राजू तावडे हिने तिच्या सुनेला सासरी बोलाविले असता त्याचा राग येऊन भाग्यश्री नागेश्वर तावडे रा. एकता नगर तळोदा व गोपाल गणेश मोरे रा रंजाने ता. शिंदखेडा यांनी मोबाईल वरून शिविगाळ करून दमदाटी केल्याची घटना दिं. 12 जून रोजी रात्री 10 बाजेच्या सुमाराला घडली म्हणून मंगलाबाई तावडे यांनी पोलिसात फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाण्यात भाग्यश्री तावडे व गोपाल मोरे यांच्या विरोधात पनाका रजि नं. 143/2021 भादवी कलम 504, 50, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ. संजय नाईक हे करीत आहेत...
0 Response to "तळोद्यात सुनेला सासरी बोलविल्याच्या राग येऊन महिलेस दोघांनी मोबाईलवर दमदाटी "
टिप्पणी पोस्ट करा