तळोदा : दारूच्या नशेत विनाकारण महिलेस एकाने शिविगाळ, दमदाटी करून हाताबुक्याने मारहाण केल्याची घटना बुधावली येथे रविवारी घडली याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील बुधावली येथील सुनील परशुराम वळवी याने दारूच्या नशेत विनाकारण स्वाती उमेश वळवी या महिलेस शिविगाळ, दमदाटी करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली म्हणून दिं.13 रोजी स्वाती वळवी यांच्या फिर्यादीवरून सुनील वळवी यांच्या विरोधात रजि नं. 144/2021भादवी कलम 323, 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ. महेंद्र जाधव हे करीत आहेत.
0 Response to "दारूच्या नशेत महिलेस मारहाण : बुधावली येथील घटना तळोदा पोलिसात गुन्हा दाखल "
टिप्पणी पोस्ट करा