
तलोद्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन भाजपा जिल्हा उपाध्यक्षानी घरवापसी करत पुन्हा हातीं घेतले धनुष्यबाण
तळोदा : भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद होणार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असून यामुळे जिल्हा भाजपातील धुसपुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याशिवाय तळोद्यातील मनसे पदाधिकाऱ्याने देखील आज शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन हाती बांधले आहे.
शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत आज नंदुरबार येथे आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला .यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, मा आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख विक्रात मोरे, जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, तळोदा शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे आदींचा उपस्थितीत होते.
भाजपाच्या विद्यमान जिल्हा उपाध्यक्षानी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मनाला जात आहे. दरम्यान, या प्रवेश सोहळ्यात तळोदा शहरातील मनसेचे तालुकाध्यक्ष कल्पेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष सूरज माळी, माजी शहर उपाध्यक्ष जयेश सुर्यवंशी, रुपेश चव्हाण, निशांत बत्तीेसे, कुलदीप वाघ, जयेंद्र कर्णकार, यादव मराठे, गणेश कर्णकार, योगेश सुर्यवंशी आदी अनेक युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
*आंनद सोनारांची शिवसेनेत घरवापसी*
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असणारे आनंद होणारे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते काही वर्षापूर्वीच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यांच्या पत्नी कोमल सोनार ह्या नगरपालिकेत शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजपामध्ये त्यांची घुसमट होत असल्याचे चित्र होते त्यांच्या शिवसेना प्रवेश हा मागील सात आठ महिन्यांपूर्वीच निश्चित झालेला मानला जात होता या संदर्भात त्यांनी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी यांची त्यांचे मित्र व शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांच्या सह भेट घेतली होती त्यावेळी त्यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत होती त्यानंतर एक मे रोजी त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असे मानले जात होते मात्र कोरोणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाला लांबणीवर पडला होता. अखेर आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत नंदुरबार येथे आले असता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरात नाराज कार्यकर्ते,पदाधिकारी आपली राजकिय वाट निवडताना दिसून येत आहे. तळोदा सोनार समाजाचे वजनदार व्यक्तिमत्त्व असणारे आनंद सोनार व मनसेच्या युवा फळीतील कार्यकर्त्याच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणूकीत शिवसेनेला याचा मोठा फायदा होईल असा कयास लावला जात आहे.
0 Response to "तलोद्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन भाजपा जिल्हा उपाध्यक्षानी घरवापसी करत पुन्हा हातीं घेतले धनुष्यबाण"
टिप्पणी पोस्ट करा