कोविड कालावधीत मातृ पितृ छत्र हरपलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी करणार अर्थसहाय्य नंदुरबार जिल्ह्यातील प्रथम उपक्रम
तळोदा : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत तळोदा शहरात अनेकांनी प्राण गमावले. तर काही मुलांनी आपले दोन्ही पालक गमवल्याने ही मुलं अनाथ झाली. या अनाथ मुलांना आधार देण्यासाठी प्रभाग 2 चे नगरसेवक पुढे आले आहेत.प्रभाग 2 मधील पितृ छत्र हरपलेल्या बालकांसाठी 1100 रु रोख व विधवा पत्नीस 50 किलो तांदूळ तर आई वडील असे दोघाचे छत्र हरपलेल्या बालकांच्या कुटुंबियांना 11 हजार रोख देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. कोरोनानं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांसाठी मदत करणारे ते पहिले नगरसेवक ठरले आहेत...
कोरोना महामारीत पालकत्व हरवलेल्या अनाथ निराधार मुले शिक्षणापासून वंचित राहू नये. याकरिता प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व सौ.अनिता संदीप परदेशी यांनी प्रभागातील पितृ छत्र हरपलेल्या 15 वर्षा आतील बालकांना मदत करणेबाबत घोषणा करण्यासाठी सकाळी 11:30 वाजता नगरसेविका अनिता परदेशी यांच्या या विक्रम नगर कॉलनीतील राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. या पत्रकार परिषदेस नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय नगरसेविका अनिता संदीप परदेशी यांच्या समवेत राष्ट्रवादीचे संदीप परदेशी, योगेश मराठे, भरत चौधरी, गणेश पाडवी, केसरसिंग क्षत्रिय, शोभा केसरसिंग क्षत्रिय आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी सांगितले की, कोरोना वैश्विक महामारीत सन २०२० व २०२१ या वर्षात कोरोनाच्या तांडवत अनेकांचे जीव गेले. कोणी आपला बाप गमावला तर कोणी आपली आई असे असंख्य रक्ताचे व जिव्हाळाचे नाते-गोते कोरोनाने विस्कळीत केले. त्यात सर्वात जास्त चटके हे बाल मनावर झालेत, अवघ्या लहान वयातच पितृ शोक पदरी पडलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधील अश्या अनाथ व निराधार पाल्यांसाठी पुढील शिक्षणात खंड पडून ते शिक्षणा पासून वंचित राहू नये, याकरिता एक उदात हेतू डोळ्यासमोर ठेवून, सामाजिक बांधीलकी जोपासत, प्रभागातील प्रत्येक अनाथ पाल्याच्या माध्यमिक शिक्षणा पर्यन्त शैक्षणिक आर्थिक पालकत्व काही अंशी स्वीकारून दर वर्षी ११०० (अकराशे रुपये) रोख व ५० किलो गहू अशी मदत विद्यमान पदावर असे पावेतो तसेच तळोदा शहरात कोरोना काळात ज्यांचे २०२० व २०२१ मध्ये मातृ व पितृ असे दोघेही छत्र हरपले असल्यास त्यांचे पाल्य अथवा परिवारास ११००० रु (अकरा हजार) ची आर्थिक मदत धनादेश स्वरूपात देण्याचे त्यानी या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
अनिता परदेशी यांनी सांगितले की, मातृ व पितृची उणीव ही कोणीही कितीही पैसे, सोन,चांदी देऊन पूर्ण करू शकत नाही, परंतु आपणही समाजाचे काही देणं लागतो ह्या निस्वार्थ हेतू व आत्मिक तळमळीने तिळमात्र मदत म्हणून आम्ही अनाथ व निराधार पाल्यांना मायेची थाप देण्याचा लहानसा प्रयत्न असल्याचा ते म्हणाले. दरम्यान असे बालक शोधण्यासाठी प्रभागात व शहरात सर्वे करून बालकांची यादी केली जाणार आहे. नगरसेवक पदावर असे पावेतो या अर्थ सहाय्याची मदत मिळणार आहे. अश्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे तळोदा शहरातील सक्रिय
नगरसेवक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी शहर वाशीयांची मन जिंकले असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अश्या आहेत अटी
◾ वयाच्या 15 व्या वर्षा आतील बालकांना मिळणार मदतीचा लाभ
◾कोविडमुळे वडील अथवा आई मयत झाल्याचा पुरावा
◾कोविड झाल्याचे प्रमाणपत्र
◾नगर परिषदेच्या मयत दाखला
◾एका कुटूंबातील एकाच पाल्याला मिळणार लाभ
0 Response to "कोविड कालावधीत मातृ पितृ छत्र हरपलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी करणार अर्थसहाय्य नंदुरबार जिल्ह्यातील प्रथम उपक्रम"
टिप्पणी पोस्ट करा