
मित्रांसोबत बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा मित्रानेच गळा आवळून केला खून
तळोदा : मित्रांसोबत बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा मित्रानेच गळा आवळून खून केल्याच्या घटना तळोदा तालुक्यातील तलावडी येथे घडली आहे. मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती....
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तलावडी येथील गणेश प्रभु पाडवी (११) या ३० एप्रिल शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याचे मित्र शैलेश ठाकरे व विकास गोविंद ठाकरे यांच्या सोबत बकऱ्या चारण्यासाठी रोझवा प्लॉटच्या जंगलात गेला होता. त्या दरम्यान, विकास ठाकरे यांनी तलावडी गावातील राज मंगल पाडवी यांच्या मोबाईलवर फिर्यादी प्रभु रामसिंग पाडवी याला सांगितले की, त्यांचा गणेश हा कोठार रस्त्याला पिंप्रीच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. तेव्हा विकास ठाकरे व कैलास ठाकरे हे बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या गणेशला घरी घेऊन आले. त्यावेळी गणेशच्या गळ्यावर काळसर रंगाच्या व्रण सारखे दिसत होते. त्यास तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन आले असता गणेश यास तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याबाबत फिर्यादी भाऊ विष्णू पाडवी याने मुलगा मयत तक्रार केली होती.त्याबाबत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
परंतु मयत गणेशच्या गळ्यावर दोरीचे वरुण सारखे दिसून आल्यामुळे त्याचे वडील प्रभु रामसिंग पाडवी याना त्याच्या मृत्यूबाबत संशय आला होता. त्याबाबत संपूर्ण खात्री केली.त्यांच्या तलावडी गावातील विकास ठाकरे व शैलेश ठाकरे यांच्याबरोबर त्यांचा मुलगा गणेश पाडवी हा बकऱ्याचे चारण्यासाठी गेला असता उसाच्या शेतात बकऱ्या चरत असताना विकास ठाकरे याने गणेश यास बकर्या वाळण्यासाठी पाठवले परंतु गणेशने त्याला नकार दिला.या कारणावरून व मागील भांडणाच्या कारणावरून मनात राग धरून रोझवा प्लॉटकडे उसाच्या शेतात पिंप्रीच्या झाडाखाली गणेश यास एकटा गाठून त्याचा दोरीने गळा आवळून त्याला जीवे ठार मारले,अशी फिर्याद मयत गणेशचे वडील प्रभू रामसिंग पाडवी यांनी दिली तळोदा पोलिसांत दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विकास गोविंद ठाकरे यांचा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत आहेत
0 Response to "मित्रांसोबत बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा मित्रानेच गळा आवळून केला खून"
टिप्पणी पोस्ट करा