
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 23 जून रोजी पंचायत समितीत दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम
तळोदा : केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि भारतीय कृत्रिम अंग निगमच्या (एलिम्को) वतीने दिव्यांगांना नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्यांना साहित्य मिळतात. याकरिता साहित्य उपलब्ध झाले असून त्याचे वितरण कार्यक्रम येत्या 23 जून बुधवार रोजी सकाळी या ८ वाजेपासून पंचायत समिती तळोदा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी केले आहे.
दिव्यांगांना अडचणींवर मात करता यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहता येण्यासाठी शासनाकडून दिव्यांगांना विविध साहित्य वाटप केले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी हा मोफत सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रम येथील तळोदा पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे..
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार अंतर्गत भारतीय कुत्रीम अंग निर्माण निगम (एल्मिको) यांच्या मार्फत वरिष्ठ कार्यालयाच्या यादीनुसार पंचायत समिती तळोदा कार्यालयामार्फत अवगत अथवा संपर्क करण्यात आलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना फोटो असलेले ओळखपत्रासह दिनांक 23 जून बुधवार रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.
या प्रकल्पांतर्गत दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल (बॅटरीवाली किंवा हाताची), कुबड्या, हाताने बसून चालवायची दुचाकी (व्हीलचेअर), आधार काठी, कृत्रिम हात-पाय, बधीर व्यक्तींना श्रवण यंत्रे, अंध व्यक्तिंना लेझर सेंन्सर उपकरणे, ब्रेल लिपीतील मोबाईल व इतर किट, गतीमंद व्यक्तिंना आधुनिक किट दिले उपलब्ध करून दिली जाणार आहे..
0 Response to "विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 23 जून रोजी पंचायत समितीत दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम"
टिप्पणी पोस्ट करा