संपर्क करा

शिर्डीत 261 संगणक प्रशिक्षकांसाठी आयसीटी कार्यशाळा संपन्न

शिर्डीत 261 संगणक प्रशिक्षकांसाठी आयसीटी कार्यशाळा संपन्न

तळोदा : नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील 261 संगणक प्रशिक्षकांसाठी “आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शिर्डी येथील 9 Coin Hotel मध्ये करण्यात आले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे संचालक संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

         आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी संगणकाशी मैत्री करून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संगणक हाताळणीचे कौशल्य विकसित व्हावे, डिजिटल तंत्रज्ञानाविषयीची भीती दूर व्हावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात वाढावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
         नाशिक विभागातील 472 शाळा व गटसाधन केंद्रांमध्ये संगणक प्रयोगशाळांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संगणक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशिक्षकांना अद्ययावत तांत्रिक ज्ञान, प्रयोगशाळा व्यवस्थापन, शैक्षणिक नियोजन आणि डिजिटल शिक्षण पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.                          कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विभाग प्रमुख अजित धसाडे, प्रकल्प प्रमुख मनोज सिंह, हिना कोसार, विभागीय एमआयएस समन्वयक पूनम वाघमारे तसेच नंदुरबार जिल्हा समन्वयक दीपक पाठक उपस्थित होते. मान्यवरांनी संगणक शिक्षणाचे महत्त्व, डिजिटल साक्षरता, आयसीटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात तंत्रज्ञानाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे संगणक प्रशिक्षकांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळून शाळांमधील आयसीटी प्रयोगशाळांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0 Response to "शिर्डीत 261 संगणक प्रशिक्षकांसाठी आयसीटी कार्यशाळा संपन्न"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article