संघर्षातून कर्तृत्वाकडे : कार्यकारी अभियंता हेमंत प्रभाकर देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास
मूळ गाव मालेगाव-झोडगे (ता. मालेगाव) येथील रहिवासी असलेले हेमंत प्रभाकर देसाई हे पुणे शहराच्या पायाभूत विकासात मोलाचे योगदान देणारे अनुभवी कार्यकारी अभियंता म्हणून ओळखले जातात. सन १९९६ मध्ये त्यांनी पुणे येथे स्थापत्य सहाय्यक म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर सातत्यपूर्ण कार्य, प्रशासकीय कौशल्य आणि जबाबदारीची जाणीव यांच्या जोरावर त्यांनी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता अशी पदे भूषवली आणि सध्या ते कार्यकारी अभियंता म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत.
त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे २००४ सालातील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकाळ. त्या काळात आयुक्त म्हणून दिलीप बँड कार्यरत असताना मुंबई–पुणे जुना रस्ता अस्तित्वात होता. या रस्त्याचे ६१ मीटर रुंदीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याचे कठीण व संवेदनशील काम त्यांनी प्रशासकीय समन्वयातून यशस्वीरीत्या पूर्ण केले. या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होऊन शहराच्या विस्ताराला गती मिळाली.
त्याच कालावधीत महापालिकेतील ४५ कोटी रुपयांचे पहिले आणि त्या वेळचे सर्वात मोठे काँक्रिट रस्त्याचे काम, म्हणजेच पिंपरी कॉर्पोरेशन ते नाशिक फाटा (२.४ किमी) रस्त्याचे बांधकाम त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. हा प्रकल्प शहराच्या दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. यासोबतच बांधकाम परवानग्या, रस्ते, नागरी सुविधा आदी विविध जबाबदाऱ्या त्यांनी कार्यक्षमतेने पार पाडल्या.
मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असले तरी पुणे शहरात त्यांनी आपले स्वतंत्र आणि सन्माननीय स्थान निर्माण केले आहे. पुण्याजवळील मावळ तालुक्यातील पिंपळखुटे परिसरात त्यांनी “सुप्रभा” नावाचे रेस्ट हाऊस उभारले आहे.
आमचे नुकतेच मित्र बनलेले शहादा तालुक्यातील शिरूड शेल्टी येथील डॉ. सुधीर पाटील यांचे ते साडू असून, त्यांच्या माध्यमातून परदेशात जात असताना त्यांच्याशी आमची भेट झाली. त्या भेटीत दिसलेला त्यांचा साधेपणा, आपुलकीचा स्वभाव आणि दिलेला वेळ यासोबतच त्यांच्या सहवासात घालवलेला वेळ हा नेहमी स्मरणात राहणारा आहे.
शासकीय सेवेतून सामाजिक विकासापर्यंतचा हेमंत प्रभाकर देसाई यांचा प्रवास हा तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे...
कौटुंबिक माहिती -
हेमंत देसाई यांचा विवाह 1997 साली भावना रावण पाटील यांच्याशी झाला. 2 आपत्य झाले. एक मुलगा व मुलगी, योगेश्वरी व अथर्व असे दोन मुले झालीत. योगेश्वरी ही सध्या कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. तर अथर्व हा सीईओ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे शिक्षण घेत आहे...
हेमंत प्रभाकर देसाई यांचा विवाह सन १९९७ मध्ये सौ. भावना रावण पाटील यांच्याशी झाला. कौटुंबिक जीवनात ते एक जबाबदार पती आणि कुटुंबवत्सल पिता म्हणून परिचित आहेत. या दांपत्याला दोन आपत्ये असून एक मुलगी व एक मुलगा असा त्यांचा सुखी परिवार आहे.
त्यांची कन्या योगेश्वरी देसाई हिने अभियांत्रिकी क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
त्यांचा मुलगा अथर्व देसाई हा सध्या सीईओ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच तो विविध तांत्रिक व व्यक्तिमत्त्व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे.
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत व्यावसायिक कारकिर्दीत यशस्वी वाटचाल करणे हे श्री. देसाई यांचे वैशिष्ट्य असून त्यांच्या कुटुंबातील शैक्षणिक व संस्कारक्षम वातावरण त्यांच्या यशामागील महत्त्वाचा आधार ठरले आहे....
0 Response to "संघर्षातून कर्तृत्वाकडे : कार्यकारी अभियंता हेमंत प्रभाकर देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास"
टिप्पणी पोस्ट करा