संपर्क करा

तळोद्यात भाजपची इतकी वाताहत का झाली?आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आवश्यक

तळोद्यात भाजपची इतकी वाताहत का झाली?आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आवश्यक

तळोदा : नगर परिषदेवर बहुमताने भाजपची सत्ता आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्णपणे धुळीस मिळाले आहे. निवडणुकीत भाजपचे जेमतेम चार नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे अनुकूल परिस्थिती असताना देखील भाजपची इतकी वाहतात का झाली? असा प्रश्न भाजप समर्थकांना पडला आहे. तर झालेल्या पराभवाला भाजपच जबाबदार असून भाजपने आता आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

तळोद्यात अनेकदा विपरीत परिस्थिती असताना देखील भाजपने नेटाने प्रयत्न करीत आपले अस्तित्व टिकून ठेवले. त्यामुळे यापूर्वी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले आहेत. दरम्यान मागील काळात बहुसंख्य ठिकाणी भाजपची सत्ता आल्यानंतर, शहरात भाजप खूपच ताकदवान झाला. आणि भाजपने स्थानिक पातळीवर विविध निवडणुकांमध्ये चांगले यश देखील मिळवले. त्यामुळे यंदाचा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षसह मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून येतील असे भाजप समर्थकांना वाटत होते. मात्र निवडणुकीत भाजपची पुरती वाताहत झाली आणि जेमतेम चार नगरसेवक निवडून आले आहेत. आणि निवडून आलेले नगरसेवक देखील स्वतःच्या बळावर निवडून आलेत असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणुकीदरम्यान चुकीची रणनीती, फाजील आत्मविश्वास व नियोजन शून्य कारभार भाजपचा दारुण पराभवाला कारण ठरले आहे.

निवडणुकीत भाजपसाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल होती. आमदार राजेश पाडवी यांचा भक्कम पाठिंबा उमेदवारांना होता. तसेच भाजपकडे दिग्गज पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता व विविध संघटना त्यांच्यासाठी काम करत होते. त्यामुळे भाजप ही निवडणूक सहज जिंकेल असा (अति)आत्मविश्वास पदाधिकारी विशेषतः उमेदवारांमध्ये होता. त्यामुळे बहुसंख्यांनी निवडणुकीचा रणांगणात ग्राउंड लेव्हलला काम न करता, नुसत्याच मोठमोठ्या बाता करण्यात धन्यता मानली. आणि त्याच्याच फटका भाजपला बसला असे बोलले जात आहे.

चौकट
चुकीच्या उमेदवारांची निवड -
भाजपने निवडणुकीत उमेदवारी देताना कुठला फॉर्म्युला वापरला असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. कारण अनेक माजी नगरसेवकांबाबत प्रभागात उघड नाराजी असताना, त्यांना तिकीट देण्यात आले. तसेच अनेक प्रभागात काहीच काम न केलेल्या बाहेरील चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपा चुकला आणि त्यामुळेच इतका मोठा पराभव झाला असे बोलले जात आहे.

चौकट
आमदारांना धक्का -
तळोद्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आजपर्यंत भाजप कधीच पराभूत झालेला नाही. मात्र यंदा पहिल्यांदा पराभूत झाला. तसेच या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या देखील खूपच मर्यादित आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकाल आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

0 Response to "तळोद्यात भाजपची इतकी वाताहत का झाली?आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आवश्यक"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article