तळोद्यात डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
तळोदा : येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी दोन्ही थोर महापुरुषांना फूलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा तर्फे करण्यात आले होते. यावेळी प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, शहादा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, ज्येष्ठ नेते प्रा. विलास डामरे, माजी नगराध्यक्षा हेमलता डामरे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी आणि भगवान माळी, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष सुभाष जैन, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, शहराध्यक्ष गौरव वाणी, जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे, उपाध्यक्ष श्रावण तिजवीज, शहराध्यक्ष जीवन अहिरे, कोषाध्यक्ष शैलेंद्र अहिरे, सरचिटणीस निमेश माळी, तालुका संयोजक वरुण राजपूत, जिल्हा संयोजक अजय ठाकरे, दीपक चौधरी, मंदिर प्रमुख आनंद मराठे, बजरंग दलचे अंकित राजपूत, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कलाल, स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी, तसेच प्रजापती भाऊ, सुभाष शिंदे, कालु पाडवी, विनोद माळी, चेतन शर्मा आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "तळोद्यात डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी"
टिप्पणी पोस्ट करा