के. आर. पब्लिक स्कूलचे विद्यार्थी मोनटेक्स टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उपविजेते
दि. १७ फेब्रुवारी २०२५
नंदुरबार – श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कूल, ज्युनियर कॉलेज नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षाखालील मोनटेक्स टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पार पडली. महाराष्ट्र मोनटेक्स टेनिस बॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विविध शाळांतील क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे के. आर. पब्लिक स्कूलच्या संघातील काही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाचे कर्णधार गजेंद्र कोकणी तसेच युगल पाटील, रोनक जैन, यश पाडवी, हेमंत कुंभार, भद्रेश चौधरी, हर्षल चौधरी, तन्मय पाटील, रितेश पटेल, कौशल चौधरी, कुशाल शेलार, राजवीर गिरासे यांनी चमकदार कामगिरी करत संघाला उपविजेतेपद मिळवून दिले.
संघाच्या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. योगेश बेदरकर व प्रशिक्षक श्री. तन्मय शहा, श्री. ऋषिकेश सोमवंशी, श्री. विक्की मराठे, श्री. सौरव गवळी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विजेत्या संघाचे संस्थेचे चेअरमन श्री. किशोरभाई वाणी, उपाध्यक्ष श्री. सिद्धार्थभाई वाणी, प्राचार्य डॉ. छाया शर्मा, उपप्राचार्य व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Response to "के. आर. पब्लिक स्कूलचे विद्यार्थी मोनटेक्स टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उपविजेते"
टिप्पणी पोस्ट करा