ग्रामपंचायत सोन बु येथे पेसा दिन साजरा
तळोदा: ग्रामपंचायत सोन बु यांच्या वतीने 24 डिसेंबर 1996 रोजी पारित पेसा कायद्याच्या अंमलबजावणीच्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आदिवासी बहुल भागातील पेसा कायद्याची जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आश्रम शाळा सोन खु ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या जनजागृती रॅलीने झाली. रॅलीमध्ये आदिवासी ढोल, मांदल यांसारखी वाद्ये वाजवून घोषणांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात पेसा कायद्याच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश वसावे (तालुका पेसा समन्वयक) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ नागरिक लोटन बाबा यांच्या हस्ते आदिवासी रितीनुसार प्रतिमा पूजनाने झाली.
ग्रामपंचायत अधिकारी अशोक पावरा यांनी पेसा कायद्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल प्रास्ताविक केले. पोलीस पाटील मेरसिंग पावरा यांनी बोली भाषेत पेसा कायद्याचे अधिकार आणि त्याचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन करताना मगन पावरा यांनीही कायद्याचे महत्त्व आणि त्याचा आदिवासी समाजासाठी उपयोग विषद केला.
कार्यक्रमात सरपंच जयश्री पावरा, उपसरपंच बजरंग दादा पावरा, कृषिसेवक सुनिल पावरा, डॉ. रतिलाल पावरा, डॉ. सुभाष पावरा, आणि आश्रम शाळेचे शिक्षकवृंद यांसह ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमांमुळे पेसा कायद्याची महत्त्वपूर्ण जनजागृती होऊन स्थानिक आदिवासी समाजाला आपल्या अधिकारांची जाणीव झाली.
0 Response to "ग्रामपंचायत सोन बु येथे पेसा दिन साजरा"
टिप्पणी पोस्ट करा