२०१९ आणि २०२४ मतदानाची तुलना: वाढत्या मतदानाचा कोणाला होईल फायदा?
२०१९ आणि २०२४ विधानसभा निवडणुकांतील मतदानाचा तुलनात्मक आढावा
नंदूरबार : २०१९ आणि २०२४ विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यातील सरासरी मतदान टक्केवारी 66.37% होती, तर २०२४ मध्ये ती 72.33% वर पोहोचली. अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर मतदारसंघांमध्ये वाढलेल्या मतदानामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
वाढलेल्या मतदानाचे मुख्य कारण म्हणजे अधिक युवक आणि महिला मतदारांचा सहभाग. याचा फायदा मुख्यतः काँग्रेसला होण्याची शक्यता आहे, कारण पारंपरिकरित्या काँग्रेस आदिवासी आणि ग्रामीण मतदारांमध्ये अधिक प्रभावी आहे. तथापि, भाजपने महिला आणि शहरी मतदारांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले असल्याने, शहरी भागात त्यांना लाभ होऊ शकतो.
तथापि, मतदानात झालेल्या या वाढीचा अंतिम फायदा कोणत्या पक्षाला होईल हे मतदारांच्या दृष्टीकोनावर आणि प्रचारावर अवलंबून असणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी:
आक्कलकुवा (ST):
एकूण मतदार: 2,78,845
मतदान झालेले: 2,00,102
टक्केवारी: 71.76%
शहादा (ST):
एकूण मतदार: 3,20,409
मतदान झालेले: 2,09,263
टक्केवारी: 65.31%
नंदुरबार (ST):
एकूण मतदार: 3,38,941
मतदान झालेले: 1,87,373
टक्केवारी: 55.28%
नवापूर (ST):
एकूण मतदार: 2,87,922
मतदान झालेले: 2,17,018
टक्केवारी: 75.37%
जिल्ह्याचा एकूण सरासरी:
मतदार: 12,26,117
मतदान झालेले: 8,13,756
सरासरी मतदान: 66.37%
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी
आक्कलकुवा (ST):
एकूण मतदार: 3,19,439
मतदान झालेले: 2,29,900
टक्केवारी: 71.97%
शहादा (ST):
एकूण मतदार: 3,52,636
मतदान झालेले: 2,43,362
टक्केवारी: 69.01%
नंदुरबार (ST):
एकूण मतदार: 3,53,781
मतदान झालेले: 2,73,746
टक्केवारी: 67.20%
नवापूर (ST):
एकूण मतदार: 2,95,786
मतदान झालेले: 2,00,042
टक्केवारी: 81.15%
जिल्ह्याचा एकूण सरासरी:
सरासरी मतदान: 72.33%
२०१९ आणि २०२४ च्या मतदान टक्केवारीतील बदल:
सर्वाधिक बदल नोंदवणारा मतदारसंघ. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये 11.92% ने मतदान वाढले, ज्यामागे प्रशासनाचे प्रयत्न आणि मतदार जनजागृती मोहिमा कारणीभूत ठरल्या.
नवापूर मतदारसंघ:
८१.१५% मतदानासह नवापूरने जिल्ह्यातील सर्वाधिक मतदानाची नोंद केली.
शहादा आणि आक्कलकुवा:
दोन्ही ठिकाणी मतदानात वाढ झाली आहे, मात्र आक्कलकुवामध्ये ही वाढ तुलनेने कमी होती.
जिल्ह्याच्या सरासरी मतदानात 5.96% वाढ झाली, हे मतदारांमधील जागरुकतेचे आणि प्रोत्साहनाचे सकारात्मक लक्षण आहे. वाढलेल्या मतदानाचा नेमका कुठल्या पक्षाला फायदा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सुधाकर मराठे
9595008844
0 Response to "२०१९ आणि २०२४ मतदानाची तुलना: वाढत्या मतदानाचा कोणाला होईल फायदा?"
टिप्पणी पोस्ट करा