नंदुरबारमध्ये मतदान केंद्रावर व्हिडीओ काढून व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल*
नंदुरबार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली होती. परंतु नंदुरबार शहरातील एका व्यक्तीने मतदान करत असताना मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे प्रशासनाने त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशनजवळील मतदान केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 चे कलम 128 चा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.
0 Response to "नंदुरबारमध्ये मतदान केंद्रावर व्हिडीओ काढून व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल*"
टिप्पणी पोस्ट करा