मतदानानंतर परतणाऱ्या ऊसतोड मजुरांचा भीषण अपघात: एकाचा मृत्यू, आठ जखमी
विसरवाडी : जवळ 132 के. व्ही. विद्युत केंद्रासमोर मालट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने ऊसतोड मजुरांचा भीषण अपघात झाला. यात सुरेश गुलचंद गायकवाड (वय ५५, रा. घोडदे, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला, तर आठ मजूर जखमी झाले आहेत.
साक्री तालुक्यातील घोडदे, डाबरी आणि बोरकीखडी येथील ऊसतोड मजूर मतदानाचा हक्क बजावून गुजरातला कामासाठी जात असताना हा अपघात झाला. चिंचपाडा रेल्वे स्थानकाकडे जात असलेल्या रिक्षाला मालट्रकने मागून जोरदार धडक दिली. रिक्षा महामार्गाच्या डिव्हायडरवर आदळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारांनंतर चार गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
मृत आणि जखमींची नावे:
मृत:
सुरेश गुलचंद गायकवाड (वय ५५, रा. घोडदे)
गंभीर जखमी:
मंगीबाई भावसिंग मालचे (घोडदे)
राजू बिंदा देसाई (डाबरी)
भावश्या जयसिंग मालचे (घोडदे)
किरकोळ जखमी:
गुलाब शंकर कुवर (डाबरी)
प्रमिला रवींद्र मालचे (बोरकीखडी)
रवींद्र मालचे (बोरकीखडी)
जय भावसिंग मालचे (वय ७, घोडदे)
अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून, अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे. कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
0 Response to "मतदानानंतर परतणाऱ्या ऊसतोड मजुरांचा भीषण अपघात: एकाचा मृत्यू, आठ जखमी"
टिप्पणी पोस्ट करा