संपर्क करा

"शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणामुळे दोन जणांना मारहाण"

"शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणामुळे दोन जणांना मारहाण"

तळोदा : तालुक्यातील विहरीमाळ येथील एका सार्वजनिक जागेवर शेतीच्या बांधावरून झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून एक व्यक्तीस मारहाण झाली असून दोन जणांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी, फिर्यादी गुलाबसिंग लालसिंग ठाकरे हे त्यांच्या काकांच्या घराजवळ असलेल्या पायवाटेवर जात होते. याच वेळी दीपक ओल्या राहसे आणि दिलीप राबत्या वळवी यांनी शेतीच्या बांधावरून झालेल्या मागील भांडणाची कुरापत काढून गुलाबसिंग ठाकरे यांना लोखंडी धाऱ्याने डोक्यावर मारहाण केली. तसेच, दिलीप राबत्या वळवी यांनी भुक्क्याने फिर्यादीच्या पाठीवर, कमरवर आणि पोटावर मारहाण केली. याप्रकरणी गुलाबसिंग लालसिंग ठाकरे यांच्या फिर्यादीवरून दीपक ओल्या राहसे व दिलीप राबत्या वळवी दोन्ही राहणार विहरीमाळ तालुका तळोदा यांच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गौतम बोराडे करत आहेत.


0 Response to ""शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणामुळे दोन जणांना मारहाण" "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article