संपर्क करा

तळोदा येथे बिरसा मुंडा चौकात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न !!

तळोदा येथे बिरसा मुंडा चौकात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न !!

तळोदा : शहरात भगवान बिरसा मुंडा यांच्या उभारण्यात आलेल्या पुतळामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल, खान्देश मधील पहिला पूर्णाकृती पुतळा आहे. आदिवासी बहुल असलेल्या नंदूरबार  जिल्हामध्ये आदिवासी क्षेत्राची स्वतःची सांस्कृतिक रचना आहे. आदिवासी क्षेत्राच्या प्रथा, परंपरा, संस्कृती रीतिरिवाज, भाषा, जल-जंगल-जमिनील व संसाधनांचा संरक्षण व जतन व्हावे ही भूमिका घेतली आहे. असेच वर्षानुवर्षे जतन राहावे या करिता सर्वांनी एकत्र यावे असे प्रतिपादन केले. आदिवासी समाजाचे आर्थिक दृष्ट्या स्तर उंचविण्यसाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहे. योजना भरपूर आहेत मात्र त्या शेवटचा लाभार्थी पावेतो कश्या पोहचेल हे महत्वाचे आहे त्या साठी सर्व लोकप्रतिनिधी नी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत जननायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा प्रसंगी व्यक्त केले. 

         शहरातील बिरसा मुंडा चौकात उभारण्यात आलेल्या भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामविकास व पंचायत राज,वैद्यकीय शिक्षण,क्रीडा व युवा कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते  करण्यात आले. शहरातील बिरसा मुंडा चौकात पुतळा अनावरण सोहळा पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार हिना गावित ह्या होत्या.  त्यांच्या सोबत आमदार राजेश पाडवी, आमदार अमरीश पटेल, आमदार आमशा पाडवी, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, जि.प अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील,पंचायत समिती सभापती लताबाई अर्जून पाडवी,उपसभापती विजय राणा,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, किसान मोर्चाचे राज्य चिटणीस राजेंद्रसिंग राजपूत, आदिवासी युवा संघटनेचे विनोद माळी,
भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटीया, रूपसिंग पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भरत पवार, संगीता प्रकाश वळवी,
भाजपा विधानसभा समन्वयक नारायण ठाकरे
,सतीश वळवी, माजी पंचायत समिती सभापती, सदस्य दाज्या पावरा,
अनिल पवार, यशवंत ठाकरे, दारासिंग वसावे, दरबारसिंग पाडवी, कैलास चौधरी, विश्वनाथ बापू कलाल, विश्वास मराठे, नगरसेवक हेमलाल मगरे,गौरव वाणी, सुरेश पाडवी, रामानंद ठाकरे, योगेश  पाडवी, अमुनोद्दिन शेख, नगरसेविका बेबीबाई पाडवी, शोभाबाई जालंदर भोई,सविता नितीन पाडवी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, प्रदीप शेंडे, भाजपा महिला आघाडीच्या शानुबाई वळवी, डॉ. स्वप्निल बैसाने, दिनेश खंदेवडल, डॉ किशोर पाटील, संजय वाणी, आदी
उपस्थित होते.
       सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मंत्री गिरीश महाजन यांनी रिमोट कंट्रोलच्या साह्याने बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले त्यानंतर,नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे देवी याहा मोगी मातेची मूर्ती भेट देऊन स्वागत केले.

       उद्घटनिय भाषणात गिरीष महाजन यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व दरवर्षी समाजाने एकजूट होऊन मोठ्या संख्येने बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करावी व सर्व समाज बांधवांनी उच्च शिक्षण घेतल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही असे त्यानी सांगितले. आदिवासींनी देशासाठी फार मोठं काम केलेलं आहे. त्यांनी आपली संस्कृती, परंपरा सातत्याने जोपासली आहे. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. हा समाज कोणावरही अवलंबून नाही. असे मत महाजन यांनी व्यक्त केले. 
    
      खासदार हिना गावित यांनी नंदूरबार येथे देखील एकलव्य व भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळ्याचे अनावरण करायचे आहे, मात्र याठिकाणी अडचणी येत असून आगामी निवडणुकीत आम्ही नक्कीच त्याठिकाणी पुतळे साकारणार असल्याचे सांगितले. संत गुलाम महाराज यांचे स्मृती स्थळ विकसित करण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी आपल्या भाषणातून केली. 


    आमदार राजेश पाडवी यांनी प्रास्ताविकेतून बोलताना सांगितले की, तळोदा शहराला  आदिवासींचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मात्र शहराच्या रस्त्याचे नामांकरन नाहीत, कुठलाही पुतळा शहरात नाही, त्यामुळे भाजप सरकार आल्यानंतर शहरातील विविध रस्त्याना महापूर्षांचे नावे देण्यात आम्ही यशस्वी ठरलो.. याशिवाय ठीकठिकाणी पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. तळोदा प्रकाशा रस्त्यावर  आदिवासी सांस्कृतीक भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असून त्याकरिता आवश्यक ती परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. आदिवासी तरुणांसाठी क्रीडा शेत्रात कामगिरी करण्यासाठी व त्यांच्यातील क्षमता दाखविण्यासाठी प्लॉट फॉर्म नाहीत त्यांना क्रीडा संकुल मिळावे यासाठी तळोदा व शहादा तालुक्यासाठी प्रत्येकी ३ कोटी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी प्रास्तविकेतून केले. 
   
      गिरीष महाजन यांनी भाषणातून योजनांचा लाभ सर्व सामान्य जनते पावेतो पोहचवा, जागृत देवस्थान असलेल्या गुलाम महाराज यांच्या स्मृती स्थळाला निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असून,  क्रीडा संकुलासाठी लागणार निधी पुढील महिन्यात घ्या, परवानगी घेवून पुतळा साकारणे खूप अवघड काम आहे. मात्र आपण ते केलेत आम्हाला अभिमान आहे असे म्हणून आमदार राजेश पाडवी नगराध्यक्ष व पालिकेचे कौतुक केले. 

   कार्यक्रमात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याबद्दल उजाळा दिला. तसेच पारंपरिक वेशभूषा , वाद्य सह नृत्य सादर करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमात वेगळीच शोभा प्रस्तापित झाली होती.
         कार्यक्रमात विजय चौधरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मान्यवर येण्याच्या अगोदर डॉ.कांतीलाल टाटिया यांनी  बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. कार्यक्रमाचे संजोजनासाठी डॉ शशिकांत वाणी व नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी,तसेच कै कलावती फाउंडेशन व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
भोजनाची व्यवस्था कै कलावती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती.

पोस्टर प्रदर्शनाने वेधले लक्ष
           अखिल भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जनजाती नायकांचे योगदान असणाऱ्या  वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी देवगिरी कल्याण आश्रम नंदूरबारच्या वतीने पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात विविध जननायक व आदिवासी संदर्भात असलेल्या विविध योजनांची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या वतीने जनजागृतीचे पोस्टर्स या प्रदर्शनात पहावयास मिळाली..

आदिवासी पारंपारिक ढोल झांज या वाद्याने वेधले लक्ष
        भगवान बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण प्रसंगी आदिवासी बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला पारंपारिक ढोल झांज या वाद्याच्या साह्याने ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करताना दिसले. ठिकठिकाणी आदिवासी पारंपारिक तिरकामठे, सिबली आदी वस्तू विक्रीस आले होते.

0 Response to "तळोदा येथे बिरसा मुंडा चौकात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न !!"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article