संपर्क करा

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा दिड दिवसाच्या गणरायाने वेधले लक्ष

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा दिड दिवसाच्या गणरायाने वेधले लक्ष

तळोदा: तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाची स्थापन करून उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

           या विसर्जन मिरवणूकीत तळोदा येथील नेमसुशिल विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. मागील ५ वर्षापासून तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाची स्थापना करण्यात येते. मंगळवारी श्री ची स्थापना करण्यात आली दुसऱ्या दिवशी गुरुवारी श्रीं ची विसर्जन मिरवणूक राज फोटो स्टुडिओ येथून सुरू झाली. दर वर्षा प्रमाणे यंदाही तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने पर्यावरणपुरक, गुलालमुक्त गणरायाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढली..

              यावेळी आमदार राजेश पाडवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, नगरअध्यक्ष अजय परदेशी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, उपनगरअध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते नागेश पाडवी, ज्येष्ठ नगरसेवक संजय माळी, नगरसेवक हेमलाल मगरे, सुभाष चौधरी, रामानंद ठाकरे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक जितेंद्र माळी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निखिल तुरखिया, भाजप किसान मोर्चाचे राजेंद्र राजपूत, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, भाजप शहर अध्यक्ष योगेश चौधरी, राष्ट्रवादी शहर प्रमुख योगेश मराठे, राष्ट्रवादीचे संदीप परदेशी, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, संजय पटेल, प्रदीप माळी, शिरीष माळी, आनंद सोनार. राहुल पाडवी, योगेश पाडवी, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, हतीम बोहरी, चेतन पवार, विपुल कुलकर्णी,  राजन पाडवी, वसंत मराठे, व्यापारी नदू जोहरी,  सुभाष जैन, प्रसाद सोनार, अमित ठक्कर, मुन्ना जैन, उदय सुर्यवंशी, कुंदन सोनार, अमित कोचर, पवन मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

            या विसर्जन मिरवणूक कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष उल्हास मगरे, उपाध्यक्ष दिपक मराठे, सचिव हंसराज महाले, कोषाध्यक्ष सुशील सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, सुनील सुर्यवंशी, भरत भामरे, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, महेंद्र लोहार किरण पाटील, नरेश चौधरी, राकेश पवार, नारायण जाधव, अक्षय जोहरी विकास राणे आदींनी परिश्रम घेतले.

पालखीने वेधले शहरवासियांचे लक्ष
          दरम्यान मागील पाच वर्षापासून दीड दिवसाच्या गणपती बसविण्यात येत असून यंदा मात्र पत्रकार संघाकडून विसर्जन मिरवणूक  काढताना बाप्पांना निरोप देताना लाकडी पालखीने हॉटेल सत्यम पासून बालाजी वाड्यापर्यंत सवाद्य लेझीम पथकासह मिरवणूक निघाली दरम्यान शहरात प्रथमच पालखीत गणरायांना पाहून शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रमुख बाजारपेठेतील व्यापारी व पायी चालणाऱ्या भाविकांनी स्वतःहून पालखीला हात बाप्पाला सन्मान दिला शहरात प्रथमच अशा पद्धतीने पालखीने बाप्पांना विराजमान करून मिरवणूक काढल्या बाबत नागरिकांना जुनी संस्कृती आठवली.. 

लोकप्रतिनिधीं थिरकले
        आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देन्यासाठी आलेले आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासह आलेल्या लोकप्रतिनिधी व्यापारी व भाविक गणरायाचा विसर्जन मिरवणुकीत थिरकले... 

0 Response to "तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा दिड दिवसाच्या गणरायाने वेधले लक्ष"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article