संपर्क करा

बारगळ व होळकर राजघराण्यातील वंशज्यांच्या भेटीच्या मी ही साक्षीदार !

बारगळ व होळकर राजघराण्यातील वंशज्यांच्या भेटीच्या मी ही साक्षीदार !

मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी महेश्वर येथे भेट देण्यास प्रसंग तळोदा येथील जहागीरदार अमरजीतराजे बारगळ यांच्या सहकार्याने मिळाला....

                          या ठिकाणी असलेले सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे निर्माण उल्लेखनीय आहे, या ठिकाणी असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंवर मुघल, राजपूत आणि मराठा वास्तुशैलीचे प्रभाव दिसून येत आहे. अहिल्या देवीच्या पुतळ्यावरील छत्रीचे अनावर प्रसंगी अमरजीतराजे बारगळ हे महेश्वर येथे आमंत्रित होते. विशेष म्हणजे 250 वर्षानंतर होळकर राजघराण्याचे 15 वे वंशज यशवंतराव शिवाजीराव होळकर व बारगळांचे 9 वे वंशज अमरजीतराव बारगळ यांच्या प्रत्यक्ष संपर्क आला. अमरजीतराजे बारगळ हे यशवंतराव होळकर यांचे मामा भाच्याचे नाते, यशवंतराव होळकर हे परदेशी शिक्षण घेतलेले उच्चभ्रू संस्कृतीत वावरले असताना त्यांचे आमच्याशी वागणे, त्यांची पाहुणचाराची पद्धत, त्यांच्यातील नम्रता व मोठे पणा, अगदी छोट्या छोट्या बाबीवर त्यांचे लक्ष होते. राजेशाही थाट असला तरी नम्रता त्यांच्या अंगी दिसून आली. 

                      शांत संयमी, निर्गवी असलेले राजासाहेबांनी पारंपरिक राजेशाही पद्धतीने आमचे स्वागत केले. विशेष म्हणजे स्वतः सोबत येऊन अहिल्या किल्लाचे दर्शन घडविले व बारीक सारीख बाबींची माहिती दिली. रात्रीचे व दुपारचे जेवण सोबत घेतले. अमरजीतरावांकडून ऐतिहासिक माहिती जाणून घेवुन त्यांची नोंद घेतली. इतिहासाची एकमएक पैलू अमरजीतरावांनी उलगडले, वयाच्या 70 री नंतरही प्रचंड स्मरण शक्ती, बारीक सारीक बाबींची असलेली माहिती, वेळेचे साधर्म्य, इतिहास उलगडताना दिलेले संदर्भ, विनोदी स्वभाव, चांगल्या चांगल्याना आपल्या ज्ञानाचा जोरावर शब्दांनी खेळवून घेण्याचे त्यांच्यातील कौशल्याचे यावेळी दर्शन झाले. 

                    बाजीराव पेशवे प्रथम यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार व पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या हेतून बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, पर्यटन मंत्री उषा ठाकूर आदींसह अन्य मंत्र्यांच्या उपस्थित रावळखेडी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी होळकर, बारगळ यांच्या परिवाराचे वंशज अमरजीतराजे बारगळ व यशवंतराव होळकर व मस्तानी यांचे वंशजाना व्यासपीठावर बोलावण्यासाठी केलेला आग्रह हा विशेष लक्षात राहणारा आहे. विशेष म्हणजे या एतिहासीक घटनेचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली त्यांचाही आनंद आहे.  

                        पूर्व नियोजन नसल्याने अचानक ठरलेल्या प्रवासाला मी नकार दिला होता. मात्र कालूभाऊचा आग्रहाखातर व राजे अमरजीत बारगळ यांच्या आलेल्या भ्रमणध्वनाला नकार देणे अवघड झाल्याने या ऐतिहासिक प्रवासाचा मी साक्षीदार झालो. याप्रसंगी धनंजय बारगळ यांचाशी चेहरा परिचय होता मात्र सहवास मिळाल्याने त्यांच्यातील विविध पैलूंची ओळख झाली..... 

                      इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांच्या वंशजाच्या लाभलेल्या या सहवासात बरेच काही शिकायला मिळाले इतिहासातील अनेक पैलू याप्रसंगी उलगडले गेले त्याच्या आनंद वेगळाच.......

0 Response to "बारगळ व होळकर राजघराण्यातील वंशज्यांच्या भेटीच्या मी ही साक्षीदार !"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article