तळोदा :अज्ञात मोटारसायकल स्वारांनी व्यापार्याची कार मधील एक लाख रुपये ठेवलेली बॅग लंपास केल्याची घटना आज दुपारी नेत्रंग- शेवडी राष्ट्रीय महामार्गावरील आमलीबारी फाट्याजवळ घडली. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथिल चहा, साबणचे घाऊक व्यापारी हुकूमचंद घिसुलल जैन हे आज दि ५ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजेचे सुमारास तळोदा येथून अर्टिगा गाडी क्रमांक एम.एच.३९ अबी ०७५५ हिचे खापर, सोरापाडा, अक्कलकुवा येथे दिलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी गेले होते. त्यांनी सुरुवातीला खापर येथून १० ते १२ व्यापार्यांकडून सुमारे एक लाख दहा हजार रुपयांची रक्कम जमा केली व ती रक्कम त्यांच्याजवळ असलेल्या रेग्जीनच्या बँग मध्ये ठेवली.पैसे ठेवलेली ती बॅग त्यांनी त्यांच्या गाडीत डायव्हर शिटच्या पाठीमागील शिटवर ठेवली.
दुपारी सुमारे १.१५ वाजता खापर येथून सोरापाडा गावातील अमनोल प्रोव्हिजन या दुकानावर आले असता त्यांना गाडीचे मागील दोन्ही चाकातील हवा कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी लगेच गाडीत बसून दुपारी सुमारे १. ५० वाजता आमलीबारी फाट्याजवळ असलेल्या पंक्चरच्या दुकानाजवळ गाडी थांबवून गाडी लाँक न करता पंक्चरवाल्याच्या दूकानावर जाऊन हवा भरण्यासंदर्भात बोलत असताना पंक्चरच्या दुकाना शेजारील गँरेजवाल्याने गाडीत काही सामान होता का? असे हुकूमचंद जैन यांना विचारले व गँरेजवाल्याने रस्त्यावरुन भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलकडे हात दाखवून या मोटारस्वार मुलांनी तुमच्या गाडीचा मागचा दरवाजा उघडुन काही तरी घेवून पळाले असल्याचे सांगितले. तेव्हा जैन यांची खात्री झाली की, अज्ञात मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात दोन इसमांनी माझ्या गाडीत ठेवलेली पैशाची बँग व पैसे चोरून नेले आहेत.
याप्रकरणी हुकूमचंद घिसुलल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटारसायकल स्वारांविरोधात चोरीचा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा पेट्रोल पपं समोर असलेल्या एम.आर.इफ शो रूमच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत..
0 Response to "तळोदा येथील व्यापाऱ्याचे कारमधून एक लाख लंपास मोटारसायकल स्वारांनी पैशाची बॅग कारमधून केली लंपास"
टिप्पणी पोस्ट करा