उसाच्या पिकात गांजाची शेती करणाऱ्यास ठोकल्या बेड्या ; 88 हजाराचा गांजा जप्त स्था.गू.अ विभागाची कारवाई
तळोदा : तालुक्यातील रामपूर येथील शेत शिवार सर्व्हे क्रमांक ६८ मध्ये ऊसाच्या पिकात16 गांजाची झाडे आढळुन आली. अंदाजे या गांजाची रक्कम ८७ हजार आठशे पन्नास रूपयांची असल्याचे पोलिसांनी सांगितले शुक्रवारी दि.२ जुलै रोजी घटनास्थळी नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने भेट देऊन ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील रामपूर गावाच्या जवळ सतोना येथील एका शेतात गांजाची झाडे असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व त्यांच्या टीमला मिळाली होती. महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात येऊन तात्काळ पथकाने घटनास्थळी भेट दिली. भेटी दरम्यान येथील रेसा नदऱ्या पाडवी याने आपल्या ऊसाच्या पिकांमध्ये एकूण १६ गांजाची झाडे अवैधरित्या लागवड केल्याचे आढळून आले. त्याची किंमती ८७ हजार आठशे पन्नास रुपये असून सदर घटनास्थळावर पो नि रविंद्र कळमकर, अ स ई अनिल गोसावी, पोहे दीपक गोरे ,पोहे महेंद्र नगराळे, पोना सुनील पाडवी, पोना विशाल नागरे, पोना बापू बागुल, पोना मोहन ढमढेरे, पोकॉ विजय धिवरे, चालक तुषार पाटील, रमेश साळुंके फॉरेन्सिक पथक नंदुरबार व तळोदा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन खात्री केली. दरम्यान त्या ठिकाणी असलेले झाडे गांजाचे असल्याचे त्यांनी खात्री पटल्याने ही कारवाई करण्यात आली.
सदर झांडांचे एकूण वजन १२ किलो ५५० ग्रँम भरले त्याची किंमती ८७ हजार आठशे पन्नास रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान तहसीलदार गिरीश वखारे यांच्या समक्ष कारवाईची पंचनामा करण्यात आला.
स्था. गु. अ. शाखांचे अनिल वसंतपुरी गोसावी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसात रेसा नदऱ्या पाडवी यांच्या विरोधात गु. र. नं. 412/2021 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 20(ब), 11(ब)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंडित सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत. तळोदा तालुक्यात देखील छुप्या पद्धतीने गांज्याची शेती होत असल्याचे समजल्याने पोलीसांसमोर आवाहन निर्माण झाले असून नागरिकांमध्ये आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे..
0 Response to "उसाच्या पिकात गांजाची शेती करणाऱ्यास ठोकल्या बेड्या ; 88 हजाराचा गांजा जप्त स्था.गू.अ विभागाची कारवाई"
टिप्पणी पोस्ट करा